साकोली तालुक्यात ५० टक्के पऱ्हे सुकले
By Admin | Updated: July 5, 2014 00:15 IST2014-07-05T00:15:42+5:302014-07-05T00:15:42+5:30
साकोली तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून तालुक्यातून चुलबंद नदी वाहते.

साकोली तालुक्यात ५० टक्के पऱ्हे सुकले
साकोली : साकोली तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. या नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला असला तरी या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे तालुक्यात ओलीताची सोय नाही व पावसाने पाठफिरविल्याने यंदा शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येणार हे स्पष्ट झाले आहे.
सध्या साकोली तालुकत शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाले असून पाण्याअभावी ५० टक्के पऱ्हे वाळले सअून एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर उर्वरित संपूर्ण पऱ्हे वाळतील. शेतकरी पऱ्हे वाचविण्यासाठी जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत.
साकोली तालुक्यात एकूण १९ हजार ७३७ हेक्टर शेतजमिन असून यात ओलीताखाली १२ हजार ४५१ हेक्टर तर कोरडवाहू क्षेत्रात ५ हजार ४८३ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
३० जुनपर्यंत साकोली तालुक्यात १ हजार २३१ हेक्टर जमिनीत धानाची पेरणी, ४०५ हेक्टर जमिनीत आवत्या, ५३३ हेक्टर जमिनीत तुर, ११ हेक्टर जमिनीत तीन, ३५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला तर ७८४ हेक्टर जमिनीत उस पिकाची लागवड करण्यात आली आहे.
महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने कोरडा दुष्काळ पडण्याची चित्र स्पष्टपणे दिसू लागली आहेत. कृषीपंपावर आधारीत शेती सुद्धा कोरडीच आहे. चुलबंद नदीवर मागील पंधरा वीस वर्षापासून निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम सुरू आहे.
या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी यावर्षी काही प्रमाणात पाणी अडविण्यात आले होते.
मात्र या प्रकल्पातील पाणीही आटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यातील भिमलकसा, घानोड प्रकल्प अपूर्ण आहेत जर हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाले असते तर तालुक्यातील शेतीला सिंचनाची सोय झाली असती, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. (तालुका प्रतिनिधी)