साकोली उपजिल्हा रुग्णालय 'सलाईनवर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 21:51 IST2018-12-30T21:51:09+5:302018-12-30T21:51:25+5:30

उपजिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार दिला जातो. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जीर्ण अवस्थेत असलेले निवासस्थान, अधिकारी व कर्मचारी बाहेर राहत असल्यामुळे अतिआवश्यक सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नाही.

Sakoli sub-district hospital on 'salalwar' | साकोली उपजिल्हा रुग्णालय 'सलाईनवर'

साकोली उपजिल्हा रुग्णालय 'सलाईनवर'

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवा

शिवशंकर बावनकुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली: उपजिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार दिला जातो. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जीर्ण अवस्थेत असलेले निवासस्थान, अधिकारी व कर्मचारी बाहेर राहत असल्यामुळे अतिआवश्यक सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नाही.
उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत महत्वाचे रुग्णालय असून सर्वच स्तरावर दुर्लक्षित रुग्णालय म्हणून गणल्या जातो आहे. उपजिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत सन १९८१ ला तयार करण्यात आली. यात जुन्या इमारतीमध्ये बाह्य रुग्ण तपासणी, एक्सरे, रक्त तपासणी, औषध वाटप विविध तपासण्या याच इमारतीमध्ये केल्या जाते. पावसाळ्यात जागोजागी अनेक कक्ष पाण्यावरून जातात. त्यावेळेस रुग्ण व वैद्यकीय अधिकारी यांना त्रास सहन करुनच रुग्णांची तपासणी केली जाते. मागील अनेक वर्षापासून देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही.
उपजिल्हा रुग्णालय १०० खाटा करिता नियोजित असून सुद्धा विकासात्मक मानसिकतेचा अभाव असल्यामुळे हे रुग्णालय १०० खाटांचे होऊ शकले नााही. ही वस्तूस्थिती आहे. वैद्यकीय अधिकाºयांची कमतरता ही समस्या मागील अनेक वर्षापासून कायम आहे. येथे वैद्यकीय अधीक्षकांची पदे १५ वर्षापासून रिक्त आहे. येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नेहमीच नागपूर, भंडारा रेफर केल्या जाते.
२१ फेब्रुवारी १९८१ ला कुटीर रुग्णालयाची इमारत तयार करण्यात आली. या इमारतीच्या सर्वच कक्षामध्ये भेगा पडल्या आहेत. स्लॅबच्या सळाखी सर्वच कक्षामध्ये दिसत आहे. या इमारतीला सुमारे ४७ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. काही दिवसापूर्वी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एन.एस. लंजे व टी.सी. देशपांडे यांच्या कक्षात वरून स्लॅबचे खिपले पडल्यामुळे किरकोळ जखमी झाले होते. कर्मचारी व उपधिकारी यांना केव्हाही स्लॅब कोसळण्याच्या भीतीमध्ये कार्य करावे लागते.

अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारतीमध्ये कार्यरत सर्व विभाग व कर्मचाºयांची इतरत्र व्यवस्था करण्यात येईल. या इमारतीला पाडण्याचे आदेश आहेत. निधी प्राप्त होताच इमारत पाडण्यात येईल.
-डॉ.चंद्रशेखर मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा कार्यालय, साकोली.

Web Title: Sakoli sub-district hospital on 'salalwar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.