साकोली नगरपरिषदेने साकारला सुंदर बगीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:25+5:302021-07-11T04:24:25+5:30
साकोली शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय कार्यालय, तलाव, वसाहत आहे. साकोली नगरपरिषद झाल्यानंतर शहराला सुंदर व स्वच्छ ...

साकोली नगरपरिषदेने साकारला सुंदर बगीचा
साकोली शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय कार्यालय, तलाव, वसाहत आहे. साकोली नगरपरिषद झाल्यानंतर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी ठिकठिकाणी उद्याने व महामार्गाला लागून झाडे लावण्याचा कार्यक्रम नगरपरिषद तर्फे राबविण्यात येत आहे. स्वच्छ साकोली सुंदर साकोली हे ब्रीदवाक्य धरून साकोली नगरपरिषद कार्यालयासमोर तसेच एम. बी. पटेल महाविद्यालयाला लागून असलेल्या जागेवर सुंदर व आकर्षक फुलझाडांचा बगीचा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या जागेकडे कुणाचे लक्षही जात नव्हते, अशा पडीत जागेवर आकर्षक फुलझाडे, लोण, पाण्याचा फवारा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना बगीच्यात वेळ घालविता येईल. या उद्यानात आकर्षक रोषणाई असलेला आय लव साकोली असा फलक लावण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या सर्व कार्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या परिश्रमातून हे सगळे शक्य झाले आहे