साकोली शैक्षणिक केंद्र व्हावे
By Admin | Updated: December 26, 2016 01:04 IST2016-12-26T01:04:53+5:302016-12-26T01:04:53+5:30
ग्रामीण विकास संघटनेच्या माध्यमातून स्व. जयंत कटकवार यांनी या भागातील

साकोली शैक्षणिक केंद्र व्हावे
नाना पटोले यांचे प्रतिपादन : कटकवार विद्यालयाच्या वार्षिकोत्सवाचे उद्घाटन
साकोली : ग्रामीण विकास संघटनेच्या माध्यमातून स्व. जयंत कटकवार यांनी या भागातील विद्यार्थ्यांसाठी कटकवार विद्यालयाची सुरुवात केली. आज या विद्यालयातून चांगले व सुसंस्कार विद्यार्थी निर्माण होत आहेत. खासदार या नात्याने साकोलीला शैक्षणिक केंद्र बनविण्याचे माझे स्वप्न आहे. असे प्रतिपादने खासदार नाना पटोले यांनी केले.
कटकवार विद्यालयाच्या वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्था सचिव विद्या कटकवार, डॉ. रंजीत कटकवार, रंविद्र डोंगरदेव, डॉ. सुरेश खोब्रागडे, साकोली नगर परिषदच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला नगराध्यक्ष धनवंता राऊत, साहित्यीक राम महाजन, संस्था सदस्य भैय्यालाल तांडे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. उत्तम गायधने, वर्ग प्रतिनिधी व प्राचार्य प्रकाश मस्के उपस्थित होते.
खा. पटोले म्हणाले, शिक्षण घेत असतांना शालेय उपक्रमाबाबद व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जबरदस्तीने तयार करण्यात शिक्षकांचा वेळ जात होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. आजचा विद्यार्थी स्वत: आवडीने अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेत आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलच्या रुपाने संपूर्ण जग हातात आलेला आहे. वर्धा येथील डोंगरदेव यांनी वर्ग १ ते १२ वीच्या मराठी कविता स्वत: म्हणून दाद मिळविली. कथा कथनाच्या माध्यमातून प्रेक्षकांची दाद मिळविली. डॉ. खोब्रागडे यांनी वाचन संस्कृती विषयी माहिती दिली. राम महाजन यांनी प्रेमा विषयी माहिती सांगितली. आईवडीलांवर प्रेम असला पाहिजे. तसेच नगराध्यक्षा राऊत यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली. तत्पूर्वी प्रा. गायधने यांनी अहवाल वाचन केला. स्व. जयंत कटकवार स्मृतीप्रित्यर्थ रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देवून शालांत परिक्षेत प्रथम, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच राज्यस्तर खेळाडू, सृष्टीमित्र पुरस्कार, आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र विद्यार्थीचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कटकवार नेचर क्लबतर्फे सारस हस्तलिखितचे विमोचन या प्रसंगी करण्यात आले. विज्ञानप्रदर्शनी नेचर क्लब प्रदर्शनी, क्रीडाविभाग प्रदर्शनीचे ही उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले.
संचालन बी. एस. लंजे व शिवदास लांजेवार यांनी केले. आभार प्राचार्य प्रकाश मस्के यांनी मानले. विविध प्रदर्शनीचे संचालन हिवराज येरणे, भोजराम मांदाळे, प्रा. अशोक गायधने, शाहिद कुरेशी, संजय भेंडारकर यांनी केले. वर्ग ९ च्या विद्यार्थिनींना सादर केलेले लेझिम नृत्य ही आकर्षक ठरले. दुपारनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमोसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)