पवनी येथे सखी महोत्सव उत्साहात

By Admin | Updated: January 13, 2016 00:36 IST2016-01-13T00:36:18+5:302016-01-13T00:36:18+5:30

लोकमत सखी मंच शाखा साकोलीच्यावतीने हनुमान मंदिरात सखी महोत्सव साजरा करण्यात आला.

The Sakhi festival is celebrated at Pavni | पवनी येथे सखी महोत्सव उत्साहात

पवनी येथे सखी महोत्सव उत्साहात

सखी मंचचा उपक्रम : विविध कार्यक्रमांची रेलचेल
साकोली : लोकमत सखी मंच शाखा साकोलीच्यावतीने हनुमान मंदिरात सखी महोत्सव साजरा करण्यात आला. यात तालुक्यातील सखींनी नाटीका, एकल नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभाग घेतलाश्र
कार्यक्रमाची सुरुवात सरिता नाकाडे यांच्या देवा श्री गणेशा या नृत्याने झाली. उद्घाटक म्हणून भारती गजापुरे या होत्या. अतिथी म्हणून गिता खेडीकर उपस्थित होत्या. पुजा खेडीकर यांच्या ‘वाजले की बारा’ या नृत्याने प्रथम क्रमांक पटकाविला. रजनी धांडे यांच्या ‘दिसला ग बाई दिसला’ या नृत्याला द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संगीता खुणे यांच्या ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या नृत्याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच माया गजापुरे यांच्या दारुबंदीवरील नाटिकेला प्रथम क्रमांक प्राप्त मिळाला. याचबरोबर स्नेहलता राऊत, दुर्गा कापगते, रजनी बनकर, मीना येवले यानीही आपल्या अभियनाने पे्रक्षकांवर छाप टाकली.
कार्यक्रमाचे परीक्षण सरिता रहांगडाले व अर्चना दोनोडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तृप्ती भोंगाडे यांनी केले. प्रास्ताविक व आभार संयोजिका सुचिता आगाशे यांनी केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: The Sakhi festival is celebrated at Pavni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.