‘साहेब, मी तुमची रामू’ कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:03 PM2018-05-06T22:03:18+5:302018-05-06T22:03:18+5:30

माया सेवाभावी बहुउद्देशिय संस्था तथा प्रशिक प्रकाशन व वितरण संस्थेच्या विद्यमाने साहित्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ लिखाण करणारे लेखक व साहित्याला पुरस्कार देण्यात येतात.राज्यस्तरावर देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी नामवंत लेखिका अस्मिता मेश्राम यांच्या 'साहेब ,मी तुमची रामू ' या कादंबरीला निवड करण्यात आली आहे.

'Saheb, I am Your Ramu' State Level Award for Kadambari | ‘साहेब, मी तुमची रामू’ कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार

‘साहेब, मी तुमची रामू’ कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : माया सेवाभावी बहुउद्देशिय संस्था तथा प्रशिक प्रकाशन व वितरण संस्थेच्या विद्यमाने साहित्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ लिखाण करणारे लेखक व साहित्याला पुरस्कार देण्यात येतात.राज्यस्तरावर देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी नामवंत लेखिका अस्मिता मेश्राम यांच्या 'साहेब ,मी तुमची रामू ' या कादंबरीला निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कादंबरी , वैचाङ्म३क साहित्य, नाटक, ललित साहित्य कथासंग्रह व कवितासंग्रह लेखकांना राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात. स्म्रृतीशेष कर्मविर सुमेध शं. वानखडे यांच्या स्म्रृतीप्रत्यर्थ राज्यस्तरीय कर्मविर सुमेध साहित्य भूषण पुरस्कारासाठी सदर कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
लेखिका -अस्मिता मेश्राम या मूळच्या वरठी येथील असून प्राध्यापक बबन मेश्राम यांच्या चुलत बहीण आहेत. नौकरी व घर सांभाळून आत्ता पर्यंत त्यांनी काव्यसंग्रह, कथासंग्रह यासह तीन कादंबरीचे लेखन केले आहे. ‘दयाघना’ नामक कथासंग्रहाला वाचकाचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: 'Saheb, I am Your Ramu' State Level Award for Kadambari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.