प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, सुविधा तोकड्या

By Admin | Updated: February 8, 2015 23:29 IST2015-02-08T23:29:19+5:302015-02-08T23:29:19+5:30

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रोज किमान ५० गाड्या धावतात. २ ते ४ प्रवासी रेल्वे गाड्या वगळल्यास इतर सर्व गाड्यांना येथे थांबा आहे. २४ तास गाड्यांची रेलचेल व प्रवाशांची ये-जा सुरू राहते.

The safety of the passengers, the security threat | प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, सुविधा तोकड्या

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, सुविधा तोकड्या

तथागत मेश्राम - वरठी
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रोज किमान ५० गाड्या धावतात. २ ते ४ प्रवासी रेल्वे गाड्या वगळल्यास इतर सर्व गाड्यांना येथे थांबा आहे. २४ तास गाड्यांची रेलचेल व प्रवाशांची ये-जा सुरू राहते. दिवसभरात ५ ते १० हजार प्रवाशी येथून ये-जा करतात. पण त्यांच्या सुरक्षेसाठी येथे सुरक्षा कर्मचारी नाही. याचा फायदा घेत दररोज प्रवाशांना लुटणारी टोळी ठिय्या मांडून राहते. जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन असुनही प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा तोकड्या आहेत. हजारोंच्या संख्येत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरेसे शेड नाही. उन्हात व पावसात त्यांना प्रवास करावा लागतो.
जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असल्यामुळे या रेल्वे स्थानकावर अधिकाअधिक रेल्वे गाड्याचा थांबा आहे. या स्थानकावर दोन प्लेटफार्म असून तिसऱ्या प्लेटफार्मचा वापर कमी प्रमाणात होते. प्लेटफार्म क्रमांक एक वर एकच शेड. त्यात प्रवाशी रेल्वे गाड्याचे तीन चार डब्बे उभे राहू शकतात ऐवढी क्षमता आहे. एका गाडीला कमीत कमी २२ डब्बे असतात. यामुळे उर्वरित डब्याच्या प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचे चटके व पावसाळ्यात पावसाचे मार खाऊन प्रवास करावा लागतो.
दोन नंबरच्या प्लेटफार्मची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. दोन्ही प्लेटफार्मवर प्रवाशाच्या बैठकीसाठी व्यवस्था नाही. दोन, चार बाकावर शेकडो प्रवासी बसणार कसे, शेवटी प्रवाशी पालखट मांडून खाली बसतात. काही बाक हे उघड्यावर लावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बसने म्हणजे तारेवरची कसरत आहे. भर उन्हात त्यावर बसून गाडीची प्रतिक्षा करणे म्हणजे स्वत:ला वेदना देण्यासारखे आहे. एक मात्र शेड असल्यामुळे शेकडो प्रवाशांना नाईलाजास्तव एकाच शेडमध्ये दाटीवाटीने बसून राहावे लागते.
सुरक्षा कर्मचारी की वसुली एजंट?
रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्याला आपले कर्तव्य बजावण्यासाठी गलेलठ्ठ पगार देण्यात येते. पण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिळणाऱ्या पगारावर यांचे पोट भरताना दिसत नाही. कर्तव्यात कसूर करण्यात पटाईत असलेले सुरक्षा कर्मचारी कधीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा चोराचा पाठलाग करताना दिसत नाही. पण रेल्वे गाड्यात व्यवसाय करणाऱ्यांकडून मात्र भिक मागणाऱ्या सारखे धावत असतात. त्यांच्यावर रूबाब दाखवून जबरन वसुली केली जाते.
खुली जागा, नशेखोराचा अड्डा
रेल्वे प्लेटफार्म सुरक्षित नाही. प्लेटफार्म एकवर असलेल्या गोदाम व व त्यापुढे असलेल्या यॉर्डजवळ दिवसभर जुगार खेळणारे व नशा करणारे युवकाचे जत्थे दिसतात. तीच अवस्था प्लेटफार्म क्रमांक २ वर आहे. जुगार खेळणे, गांजा किंवा इतर नशेयुक्त पदार्थाचे सेवण करणे आणि प्रवाशांना लुटणे हा प्रकार नित्याचाच झाला आहे. एकंदरीत ही खुली जागा नशा खोराचा अड्डा बनला आहे.

Web Title: The safety of the passengers, the security threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.