सदाेष शवदाहिनीचा नातेवाईकांना मन:स्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:45+5:302021-09-23T04:39:45+5:30

माेहाडी तालुक्यातील वरठी येथे स्मशानभूमीत अग्निसंस्कारासाठी शवदाहिनी तयार करण्यात आली. दीड वर्षापासून श्रेयवादात अडकलेली शवदाहिनी एकदाची स्मशानभूमीत काेणताही गाजावाजा ...

Sadesh mourns the relatives of the deceased | सदाेष शवदाहिनीचा नातेवाईकांना मन:स्ताप

सदाेष शवदाहिनीचा नातेवाईकांना मन:स्ताप

माेहाडी तालुक्यातील वरठी येथे स्मशानभूमीत अग्निसंस्कारासाठी शवदाहिनी तयार करण्यात आली. दीड वर्षापासून श्रेयवादात अडकलेली शवदाहिनी एकदाची स्मशानभूमीत काेणताही गाजावाजा न करता लावण्यात आली. यासाठी सनफ्लॅग कंपनीने सीएसआर निधीतून पैसे दिले हाेते. दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली शवदाहिनी तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याचे आता दिसून येत आहे. मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी त्याचा उपयाेग हाेताना दिसत नाही. शववाहिनीचे कठडे वाजवीपेक्षा जास्त उंच आहेत. त्यामुळे सरण रचताना अडचणीचे जाते. अनेकदा तर मृतदेह पूर्णत: जळत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करावे लागतात. या प्रकाराला कंटाळून नागरिक उघड्यावरच अंत्यसंस्कार करत आहेत. ओट्यांवर शवदाहिनीनेच संपूर्ण जागा व्यापल्याने तेथे जागा नाही. पावसाळ्यात तर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

बाॅक्स

श्रेयासाठी पुढाकार, दुरुस्तीसाठी गायब

शवदाहिनी तयार करण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले, असे म्हणत अनेक पुढाऱ्यांनी श्रेय लाटले. आता नागरिकांना मन:स्ताप हाेत असताना दुरुस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. शवदाहिनीवर खर्च केला कुणी आणि श्रेय काेण घेताे, अशी स्थिती आहे. तांत्रिक दाेष असल्याने नागरिक संतापल्याचे पाहून श्रेय घेणारे पुढारी मात्र गायब झाले आहेत.

Web Title: Sadesh mourns the relatives of the deceased