ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:49 IST2017-12-20T23:49:24+5:302017-12-20T23:49:52+5:30

एक वषार्पासून एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती रखडलेली आहे. या नियुक्त्या तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने महावितरणला केली आहे.

Rural Electrification Manager | ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती ठप्प

ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती ठप्प

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांना निवेदन : घोषणेनंतरही भरती नाही

आॅनलाईन लोकमत
भंडारा : एक वषार्पासून एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती रखडलेली आहे. या नियुक्त्या तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने महावितरणला केली आहे.
गावातील विद्युत व्यवस्थेत निर्माण होणाºया अडचणी गावातच निपटारा व्हावा, यासाठी प्रत्येक गावात ग्रामविद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती करावी, असे राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला सुचविले होते. या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने उमेदवाराचे अर्ज मागविल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करून त्याची शिफारस वीज महावितरणकडे केली होती. आता या प्रक्रियेला एक वर्ष होऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. तर विद्युत व्यवस्थापक नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. सदर ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा शिवसेना आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, उपसभापती ललित बोंद्रे, रोशन कळंबे, अमित एच. मेश्राम, मुकेश थोटे, जितेश ईखार, अशोक कडव, निलेश कोकासे, प्रशांत सोनवाने, विनोद बानेवार, रूपेश बिसने, दिनेश राऊत, गणेश शेंडे, राहुल सोनवाने, रविन्द्र बोरकर, संदीप बुधे, कृष्णा पारधी, कैलाश झंझाड, लक्ष्मीकांत नारनवरे, नागेश बनकर, प्रशांत भोयर, संजय सोनेवाने, अनिल बावने, वामेश उरकूडे, नितेश तांडेकर, रूपेश गभने, सूरज सरोदे उपस्थित होते.

Web Title: Rural Electrification Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.