मशाल फेरीतून ग्रामविकासाचा संकल्प
By Admin | Updated: July 27, 2016 00:39 IST2016-07-27T00:39:06+5:302016-07-27T00:39:06+5:30
ग्रामपंचायत शिवनी (मोगरा) या गावाने ग्रामस्थांच्या सहकार्याने राज्य शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त करुन गावाचा विकास साध्य केला आहे.

मशाल फेरीतून ग्रामविकासाचा संकल्प
शिवनी येथे कार्यक्रम : शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांच्या आरोग्यावर भर
भंडारा : ग्रामपंचायत शिवनी (मोगरा) या गावाने ग्रामस्थांच्या सहकार्याने राज्य शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त करुन गावाचा विकास साध्य केला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शिवनी येथे आमचं गाव आमचा विकास या कार्यक्रमातंर्गत लोकसहभागातून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
पंचायत समिती सदस्य दादु खोब्रागडे व सरपंच माया कुथे यांच्या हस्ते मशाल पेटवून मशालफेरीस सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहभाग घेतला.
मशालफेरीनंतर ग्रामसंसाधन गटाची भेट घेऊन ग्राम विकासाची संकल्पनेबाबत प्रशिक्षक शंकर तेलमासरे व प्रभारी अधिकारी जे. डब्ल्यु. राऊत यांनी मार्गदर्शन केले. सन २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंतचा पंचवार्षिक नियोजन आराखडा तयार करताना अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर, शुध्द पाण्याचा प्रकल्प, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या बाबींचा समावेश करण्यात यावा, वार्षिक नियोजन आराखडा तयार करताना विशेषत: आरोग्य, शिक्षण, उपजिवीका १० टक्के, महिला, बालकल्याण १५ टक्के, मागसवर्गीय कल्याण, ३ टक्के अपंग कल्याणसाठी तरतुद करण्यात यावी, याचा समावेश आहे. यावेळी जयंत गडपायले, उपसरपंच सतीश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भिमराव खांडेकर, गिता शेंडे, रेखा लांडगे, रत्नमाला खांडेकर, आरोग्य सेविका फुंडे, डोंगरे, निवृत्ता शेंडे, हेमराज शेंडे, संदिप शेंडे, मुख्याध्यापक वंजारी, शिक्षक बोरकर, कापगते, रामटेके, राऊत, फुंडे, पोलीस पाटील कुनभरे, मुनेश्वर खांडेकर, आंगणवाडी सेविका नागलवाडे, शेंडे, खांडेकर, कुथे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)