वन्यप्राण्यांची गावांकडे धाव
By Admin | Updated: March 28, 2015 00:35 IST2015-03-28T00:35:01+5:302015-03-28T00:35:01+5:30
वनप्रदूषण, पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच जंगली प्राणी जंगलातून निघून शेतशिवारात न थांबता थेट गावांमध्ये, मानववस्तीत आश्रय घेत असतानाचे चित्र सध्या गावागावात पाहायला मिळत आहे.

वन्यप्राण्यांची गावांकडे धाव
मासळ : वनप्रदूषण, पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच जंगली प्राणी जंगलातून निघून शेतशिवारात न थांबता थेट गावांमध्ये, मानववस्तीत आश्रय घेत असतानाचे चित्र सध्या गावागावात पाहायला मिळत आहे. एरवी माकडे ही शेतशिवारात किंवा जंगलात दिसायची. परंतु ुउपरोक्त सर्व बाबींमुळे माकडांनी मनुष्याच्या वस्तीमध्ये आपले बस्तान मांडले आहे.
जैतपूर येथील नरेंद्र कॉलनी, एरिगेशन कॉलनी तसेच कावळे राईस मिल परिसरात माकडांचा धुमाकुळ नित्याचीच बाब ठरलीअ ाहे. पुरुषवर्ग दिवसभर कामानिमित्त घराबाहेर जातात.
त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना व लहान मुलांना याचा सर्वात जास्त त्रास होत आहे. नर वानर हे अतिशय उग्र असतात व महिला व मुलांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करतात.
त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. माकड हा एकच प्राणी असा आहे की तो रंगातील फरक ओळखू शकतो. लाल रंगावर माकड हे जास्त राग व्यक्त करतात. माकडांनी गावात बस्तान मांडल्यामुळे परसबागातील रोपटे, फुलझाडे, टीव्हीचे अँटीना, घरावरच्या कवेलू यांचे अतोनात नुकसान झालेले आहणे. एवढेच नाही तर पाणी पिण्यासाठी बाथरूममध्ये घुसून पाणी पितात.
बाहेरील नळाचे पाईप सुद्धा तोडण्याचा प्रताप सुद्धा माकडांनी केलेला आहे. तसेच जीवनोपयोगी वस्तू, दाळ, धान्ये व इतर किरकोळ वस्तू उन्हात बाहेर वाळवायला घालणे सुद्धा गृहिणींना कठीण होत आहे.
अशाप्रकारे माकडांच्या माकडचेष्टांवर आवर घालण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा या परिसरातील माकडांचा बंदोबस्त वनाधिकाऱ्यांनी करावा असे मत विजय ब्राम्हणकर, योगेश ब्राम्हणकर, विनोद पिल्लारे, चंदा झलके, सुनिल चौधरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच जंगलामध्ये पाणवठ्याची संख्या वाढवून वृक्षाचे संवर्धन केल्यास माकडांचे मानववस्तीत होणारे स्थलांतर थांबविता येईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)