गराडा नाल्यावर रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:24+5:30
कारधा पोलीस ठाण्यात ठाणेदार श्रीराम लांबाडे रूजू झाले. त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशातच गराडा बुज. येथील नाल्यावर हातभट्टीची दारु काढली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराडे, शंकर चौधरी, देवेंद्र खडसे, विवेक रणदिवे, आकाश सोनुले, गजानन जाधव, रमेश वाघाडे यांनी धाड मारली.

गराडा नाल्यावर रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील गराडा (बुज.) नाल्यावर हातभट्टीची दारु गाळली जात असल्याच्या माहितीवरून धाड टाकून पोलिसांनी रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त केली. मोह सडवासह २० लिटर दारु असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारधा पोलीस ठाण्यात ठाणेदार श्रीराम लांबाडे रूजू झाले. त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशातच गराडा बुज. येथील नाल्यावर हातभट्टीची दारु काढली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराडे, शंकर चौधरी, देवेंद्र खडसे, विवेक रणदिवे, आकाश सोनुले, गजानन जाधव, रमेश वाघाडे यांनी धाड मारली. त्या ठिकाणी गावठी दारु गाळली जात होती.
पोलिसांनी ही हातभट्टी उद्ध्वस्त केली. तेथून ७ प्लास्टीक ड्रम, १०० किलो मोह सडवा, चार मोठे प्लास्टीक ड्रम, त्यात २०० किलो मोह सडवा, १५ मातीचे मडके आणि २० लिटर गावठी दारु जप्त केली. या प्रकरणी आरोपी सुभाष शामराव खंगार (३०) आणि लक्ष्मण कोदूजी खंगार (४५) यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
मटका, जुगार अड्ड्यांवर कारवाई केव्हा
कारधा पोलीस ठाणे नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मटका, जुगार अड्डे सुरू आहे. या अड्ड्यांकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. एकट्या भंडारा शहरात ५० च्या वर मटका जुगार अड्डे सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. परंतु गत सहा महिन्यात कुठेही कारवाई झाली नाही. ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. पोलीस अशा अड्ड्यांवर केव्हा कारवाई करणार?