उड्डाणपूल संरक्षकावर ट्रक धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:50 IST2018-08-31T21:49:47+5:302018-08-31T21:50:06+5:30
भरधाव ट्रकने उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याची घटना देव्हाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. तुमसर-रामटेक या राज्य महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. राज्य महामार्गावर पर्यायी रस्ता तयार केला. परंतु तो अरूंद आहे. एकावेळी दोन वाहने जाताना तारेवरची कसरत करावी लागते.

उड्डाणपूल संरक्षकावर ट्रक धडकला
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भरधाव ट्रकने उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याची घटना देव्हाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली.
तुमसर-रामटेक या राज्य महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. राज्य महामार्गावर पर्यायी रस्ता तयार केला. परंतु तो अरूंद आहे. एकावेळी दोन वाहने जाताना तारेवरची कसरत करावी लागते.
अशातच शुक्रवारी दुपारी ३ वाजता एक महाकाय ट्रक गोंदियाकडे जात होता. वळण मार्गावर पर्यायी रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून संरक्षक भिंत तुटली नाही अन्यथा मोठा अपघात झाला असता. परंतु या अपघातामुळे राज्य मार्गावर वाहतूक तासभर ठप्प झाली होती.