कृषिपंपाची १.७७ कोटींची थकबाकी

By Admin | Updated: December 7, 2014 22:45 IST2014-12-07T22:45:48+5:302014-12-07T22:45:48+5:30

शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरु करण्यात आली. ही योजना अमलात आली. तो काळ

Rs 1.77 crore outstanding for agriculture | कृषिपंपाची १.७७ कोटींची थकबाकी

कृषिपंपाची १.७७ कोटींची थकबाकी

पालोरा (चौ.) : शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरु करण्यात आली. ही योजना अमलात आली. तो काळ शेतकऱ्यांचा हंगामाचा होता. शेतीच्या पेरणीकरिता पैसे लागत असल्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून कोसो दूर राहिले.
पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची वीज थकबाकी १ कोटी ७७ लाख ९ हजार ९१३ रुपये शिल्लक आहेत. यात तालुक्यात ६,३७६ शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत. यापैकी २ हजार ३७३ शेतकऱ्यांनी ८३ लाख ४ हजार ९६२ रुपये भरून कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे. आता शेतकऱ्यांकडे महावितरणाचे ८० लाख ४७ हजार ९३३ रुपये थकबाकी आहे. ही योजना जरी शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी ठरत असली तरीही या योजनेची अल्प मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून मुकावे लागले.
ज्या प्रसंगी ही योजना राबविण्यात आली त्या काळात शेतकऱ्यांकडे पैसा नव्हता, आता शेतकऱ्यांचे उत्पन्न हातात आले आहे. अशा प्रसंगी कृषी संजीवनी योजनेची मुदत संपल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे. वीज महावितरण कंपनीने या योजनेची मुदत वाढविण्याची मागणी, तालुक्यातील आझाद शेतकरी संघटनेनी केली आहे.
पवनी तालुक्यातील शेतकरी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुष्काळग्रस्त परिस्थितीने संकटात सापडलेला आहे. हा तालुका तांदळाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात पाण्याचे स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे कृषी मोटर पंप जास्त प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे कोट्यवधी रुपयेथकबाकी आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी वीज देयक भरू शकत नाही. दुसरीकडे भारनियमनामुळे दमछाक होत आहे. परिणामत: वीज वितरण कंपनीविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
शेतकऱ्याकडची मोटरपंपाची थकबाकी वीज वितरण कंपनीला डोकेदुखी जरी ठरली असली तरी मात्र कृषी संजीवनी योजनेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी कृषी संजीवनी योजना अमलात आली मात्र अनेक शेतकऱ्यांनीया योजनेचा लाभ घेवून सुद्धा वीज देयक लागूनच येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेची मुदत सं्ल्यामुळे आता वीज बिल कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या योजनेची मुदत वाढविण्याची अत्यंत गरज आहे. संबंधित वीज वितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Rs 1.77 crore outstanding for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.