निधीअभावी रखडले बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:23 PM2019-03-19T21:23:15+5:302019-03-19T21:23:33+5:30

प्र्नधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गाव तिथे रस्ता असा उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु तुमसर तालुक्यातील सौदेपूर-खैरटोला रस्तावर सुमारे एक कि.मी. अर्धवट बांधकाम करण्यात आले. नियोजनाचा अभाव व निधीच्या कमतरतेमुळे एक कि.मी. रस्ता बांधकाम रखडले आहे. सुमारे सहा कि.मी.चे रस्ता बांधकाम येथे करण्यात आले.

Route Construction | निधीअभावी रखडले बांधकाम

निधीअभावी रखडले बांधकाम

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधानमंत्री ग्राम सडक योजना : एक किमीचा सौदेपूर-खैरटोला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : प्र्नधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गाव तिथे रस्ता असा उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु तुमसर तालुक्यातील सौदेपूर-खैरटोला रस्तावर सुमारे एक कि.मी. अर्धवट बांधकाम करण्यात आले. नियोजनाचा अभाव व निधीच्या कमतरतेमुळे एक कि.मी. रस्ता बांधकाम रखडले आहे. सुमारे सहा कि.मी.चे रस्ता बांधकाम येथे करण्यात आले.
सौदेपूर-खैरटोला रस्ता बांधकामाकरिता सुमारे एक ते सवा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. घनदाट जंगलातून हा रस्ता बांधकाम करण्यात आला आहे. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. चिचोली लाटा ते रेल्वे अंडरपास पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ता बांधकाम केला. त्यापुढील सुमारे सहा कि.मी. चा रस्ता पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत विभागाने रसता तयार केला.
सध्या एक कि.मी. चा रस्ता निधी अभावी बांधकाम रखडले आहे. नियोजनाच्या अभावाचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पुन्हा निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता पूर्ण होणार आहे. सुमारे १५ ते १७ गावांना हा रस्ता जोडतो. जंगलातील महत्वपर्णू हा रस्ता आहे. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून गाव तिथे रस्ता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे या विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. पुन्हा सदर रस्त्याकरिता निधी मंजूर करण्याची येथे गरज आहे.

सौदेपूर - खैरटोला रस्ता बांधकामादरम्यान सुमारे एक कि.मी. रस्ता बांधकाम करावयाचे आहे. पुढे हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे.
-जी.आर. हत्तीमारे,
कनिष्ठ अभियंता,
पंतप्रधान सडक योजना, भंडारा.

Web Title: Route Construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.