‘वखार’च्या रोटेशन पद्धतीला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:53+5:30

तुमसर येथे बाजार समितीजवळ वखार महामंडळाचे गोदाम आहे. तुमसर तालुक्यात धान भरडाई करून तांदूळ तयार करण्यात येते. सदर तांदूळ मिलर वखार महामंडळाला देतात. तुमसर व मोहाडी तालुक्यात धान भरडाई करणाऱ्या मील आहेत. वखार महामंडळ गोदामात तांदूळ मोजमाप करण्याचे नियम ठरवून दिले आहेत. रोटेशन पद्धतीने येथे तांदळाचा वजनकाटा करण्यात येतो.

Rotate the rotation method of 'warehouse' | ‘वखार’च्या रोटेशन पद्धतीला हरताळ

‘वखार’च्या रोटेशन पद्धतीला हरताळ

Next
ठळक मुद्देमिलर असोसिएशन सदस्यांमध्ये रोष : माजी आमदारांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वखार महामंडळात रोटेशन पद्धतीने मिलरचे तांदळाचे ट्रक वजन काटा भरण्याचा नियम आहे. परंतु काही दिवसापासून येथे मर्जीतील एका मिलरचे ट्रकच वजनकाटा करणे सुरु आहे. यावर मिलर असोसिएशनने आक्षेप घेतला. याप्रकरणी माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडे तक्रार केली. वाघमारे यांनी वखार महामंडळात भेट देऊन नियमानुसार कार्य करण्याचे निर्देश दिले.
तुमसर येथे बाजार समितीजवळ वखार महामंडळाचे गोदाम आहे. तुमसर तालुक्यात धान भरडाई करून तांदूळ तयार करण्यात येते. सदर तांदूळ मिलर वखार महामंडळाला देतात. तुमसर व मोहाडी तालुक्यात धान भरडाई करणाऱ्या मील आहेत. वखार महामंडळ गोदामात तांदूळ मोजमाप करण्याचे नियम ठरवून दिले आहेत. रोटेशन पद्धतीने येथे तांदळाचा वजनकाटा करण्यात येतो. तशा सूचना दर्शनी फलकावर लावण्यात आल्या आहेत.
गत काही दिवसांपासून तांदळाचे वजनकाटा रोटेशन पद्धतीने न होता मर्जीतील मिलरच्या तांदळाचा वजनकाटा येथे करणे सुरु आहे. यावर मिलर असोसिएशन सदस्यांनी आक्षेप घेतला. याबाबत माजी आमदार चरण वाघमारे यांचेकडे तक्रार केली. त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत तुमसर येथील वखार महामंडळ गोदामाला भेट दिली.
तहसीलदार गजेंद्र बालपांडे, वखार महामंडळाचे अधिकारी पिकलमुंडे यांना याबाबत विचारणा केली. रोटेशन पद्धतीने तांदूळ मोजमाप न करता मर्जीतील मिलरचे तांदळाचे मोजमाप करताना इतर मिलर्स सदस्यांवर अन्याय होत असून ते तात्काळ बंद करून नियमानुसार मोजमाप करण्याचे निर्देश माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिले. याप्रसंगी मिलर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Rotate the rotation method of 'warehouse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.