बोधिचेतीय विहारात वर्षावास अनुष्ठान

By Admin | Updated: October 27, 2016 00:33 IST2016-10-27T00:33:50+5:302016-10-27T00:33:50+5:30

बोधिचेतीय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एम.आय.डी.सी. खुटसावरी मार्ग स्थित बोधिचेतीय विहारात ...

Roshivasan Rituals at Bodhisatthei Vihara | बोधिचेतीय विहारात वर्षावास अनुष्ठान

बोधिचेतीय विहारात वर्षावास अनुष्ठान

भंडारा : बोधिचेतीय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एम.आय.डी.सी. खुटसावरी मार्ग स्थित बोधिचेतीय विहारात आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास करीत असलेले बौद्ध - भिक्षु डॉ.भदंत धम्मदीप महाथेरो व भदंत अ‍ॅड. शुभंकर यांचा सोमवार रोजी वर्षावास समापन झाला.
वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे. या काळात भिक्षु विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्षुद्वारा पूर्तता करणे, ध्यान - साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरीत नऊ महिने धम्म - प्रचार - प्रसाराला घालविणे हे भिक्षुंचे कार्य असतात.
तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय ब्राम्हण संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्य सत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन मृतदाय वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन माझ्या बहुजन हिताय - बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्षु वर्षावास प्रारंभ करतात. यावेळी कालगत बौद्ध भिक्षु नागपथ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वर्षावास समाप्त प्रसंगी डॉ.भदंत धम्मदीप व भदन्त एड.शुभंकर यांनी मौलिक उद्बोधन केले. या प्रसंगी उपस्थित असलेले बौद्ध - भिक्षु नामे - भदंत सुगत, भदंत आनंद व भदंत सम्यक बोधि, भदंत नागसेन, विनयबोधी. नामांकीत वक्ते विनोद रामटेके, केशव रामटेके, प्रतिभाताई मेश्राम यांनी मौलीक मार्गदर्शन केले. अतिथींच्या रुपात श्रामणेरी धम्मानंदा, गजानन मेश्राम, सेवानिवृत्त तहसीलदार निर्मलाताई उके प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुषमा वासनिक, चांगुना कांबळे, अर्चना खोब्रागडे, कुंता बारसागडे, धनंजय रामटेके, रक्षिता रुस्तम बोरकर, अमरदीप बोरकर, सविता शेंडे, प्रियंका शेंडे, स्वप्ना वैद्य, मोहन शहारे, मालती गडकरी, सीताराम वासनिक, मारोती करवाडे, विश्वलता मडामे, शुक्रतारा गजभिये, बंडू तिरपुडे, रामकृष्ण कांबळे, दिनेश रामटेके, ज्वाला रंगारी, रत्नमाला वासनिक, रेखा टेंभुर्णे, मनोज वासनिक यांच्यासह बौध्द उपासक- उपासिकांनी विशेष परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Roshivasan Rituals at Bodhisatthei Vihara