रोहयो मजुरांना मिळणार घरकूल

By Admin | Updated: September 29, 2014 00:38 IST2014-09-29T00:38:10+5:302014-09-29T00:38:10+5:30

भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन २०१३-१४ सत्रात सलग १० दिवस कामे केलेल्या मंजुरांना कामगार कल्याण विभाग मार्फत घर बांधणी करीता २ लाख रूपयाचे अर्थ

ROHYO workers will get home loan | रोहयो मजुरांना मिळणार घरकूल

रोहयो मजुरांना मिळणार घरकूल

चुल्हाड : भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन २०१३-१४ सत्रात सलग १० दिवस कामे केलेल्या मंजुरांना कामगार कल्याण विभाग मार्फत घर बांधणी करीता २ लाख रूपयाचे अर्थ सहाय्य दिले जाणार आहे. या मजुरांची जिल्हा कार्यालयात नोंदणी सुरू झाली असून तुमसर तालुक्यात ३४४ मजुरांचा समावेश आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत तुमसर पंचायत समितीने अव्वल स्थान पटकाविले आहे. या तालुक्यात १०० दिवस मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आली आहेत. अत्यंत हलाखीत जिवण जगत असलेल्या जाबकार्डधारक रोहयो मजुरांना आधार देणारी योजना कामगार कल्याण विभाग मार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत सलग ९० दिवस रोहयो कामावर रूजू असणारे मजुरांची नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेत लाभार्थी नोंदणीकृत पुरूष कामगारांच्या पत्नीला शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करीता १० हजाराची आर्थिक मदत दिली जाणार आहे. कामगराचे भवितव्य उंचाविण्यासाठी कामगार कल्याण विभागाने १० सूत्राची यात समावेश केलेला आहे.
महिला लाभार्थी नोंदणीकृत कामगारांना नैसर्गिक प्रसूती लाभ झाल्यास ५ हजार आणि सिझेरिअनकरिता १० हजारांचे अनुदान देण्यात येईल. या शिवाय घर दुरूस्तीकरिता दीड लाख व घर बांधणीसाठी दोन लाखाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या नोंदणीकृत मजुरांचे अपघातील निधन झाल्यास दोन लाखांचा अपघाती विमा कुटुंबीयांना मिळणार आहे.
नोंदणीकृत मजुरांना कायमचे अपंगत्व आल्यास एक लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय १ ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहेत. या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून अद्याप मजुरांनी नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही, अशी माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)

Web Title: ROHYO workers will get home loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.