लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : रोजगार हमी अंतर्गत भातखाचरे कामावर गैरहजर असलेल्या मजुरांनाही मजुरी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी संतप्त झालेल्या मजुरांसह अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. ही घटना डांबेविरली येथे शनिवारी घडली. उल्लेखनीय म्हणजे रोजगार सेवकाने निधीचा अपहार केल्याची कबुली देत ग्रामपंचायतीकडे राजीनामा सोपविला.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डांबेविरली येथे भात खाचरे कामावर हजेरी पत्रकानुसार ६१० मजूर नोंदणीकृत होते. त्यापैकी या कामावर ४४६ मजूर उपस्थित असल्याचे हजेरी पत्रकात नमूद आहे. मात्र उपस्थित मजुरांपैकी पाच पेक्षा अधिक मजूर कामावर दाखविण्यात आले. प्रत्यक्षात ते मजूर कामावर नव्हते. याची माहिती गावकरी व मजुरांना मिळाली. संतप्त ग्रामस्थ व मजूर ‘रोजगार सेवक हटाव’ या मागणीला घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडकले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी रोजगार सेवक राजेश्वर धोटे यांना गैरप्रकाराचा जाब विचारण्यात यावा अशी मागणी केली. रोजगार सेवकाने गैरहजर असलेल्या मजुरांच्या नावे मजुरी दिल्याचे कबूल करीत राजीनामा सोपविला. यात तांत्रिक अभियंता व ग्रामसेवक यांचा सहभाग नसल्याचे सांगितले. यावेळी सरपंच सुमंत रामटेके, ग्रामसेवक वाय.एच. डोंगरवार, पोलीस पाटील नामदेव प्रधान, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवनाथ धोटे, माजी सरपंच दीपक बुराडे, वासुदेव बुराडे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय धोटे, अभियंता जयंत भुसारे, प्रवीण राऊत, उपसरपंच जयेश मांढरे, रत्ना भागडकर आदी उपस्थित होते.रोजगार सेवकाने राजीनामा देऊन संबंधित गैरप्रकाराची जबाबदारी झटकली असली तरी गैरहजर असलेल्या मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्या मजुरीचे काय होणार असा प्रश्न उपस्थित असलेल्या नागरिक व मजुरांनी उपस्थित केला. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. सरपंच सुमंत रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
रोहयो कामात अपहार संतप्त मजूर धडकले ग्रामपंचायतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डांबेविरली येथे भात खाचरे कामावर हजेरी पत्रकानुसार ६१० मजूर नोंदणीकृत होते. त्यापैकी या कामावर ४४६ मजूर उपस्थित असल्याचे हजेरी पत्रकात नमूद आहे. मात्र उपस्थित मजुरांपैकी पाच पेक्षा अधिक मजूर कामावर दाखविण्यात आले. प्रत्यक्षात ते मजूर कामावर नव्हते. याची माहिती गावकरी व मजुरांना मिळाली.
रोहयो कामात अपहार संतप्त मजूर धडकले ग्रामपंचायतीवर
ठळक मुद्देडांबीविरली येथील घटना । रोजगार सेवकाने दिला राजीनामा