रोहयोच्या विहिरींना ११ गावे मुकणार
By Admin | Updated: January 11, 2016 00:30 IST2016-01-11T00:30:20+5:302016-01-11T00:30:20+5:30
राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले ...

रोहयोच्या विहिरींना ११ गावे मुकणार
२३७ विहिरीचे नियोजन : उदासीनता कारणीभूत
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले तरी तुमसर तालुक्यातील ११ गावातुन विहिर मंजुरीचे प्रस्तावच देण्यात आले नाही. यामुळे ग्राम पंचायतीची उदासिनता दिसून आली आहे. यात सिहोरा परिसरातील सात गावांचा समावेश आहे.
रोहयो योजनेत कुशल आणि अकुशल कामाचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेत आधी सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करण्यात आली आहेत. अनेक गावात सिमेंट रस्ते व समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. गावात वर्दळ नसतांना ही अशा जागेत सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाली आहेत. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ गेला आहे. यामुळे रोहयो योजना शेतकऱ्यांचे शेत शिवारात राबवण्यिाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रोहयो अंतर्गत विहिर बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध केला जाणार आहे. यात दोन लाखांचे कुशल व एक लाख खर्चाचे अकुशल कामे केली जाणार असुन मजुराच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत प्रस्ताव मागविण्यात आले असून तुमसर पंचायत समिती अंतर्गत ३२७ विहिर बांधकाम मंजुरीचे नियोजन करण्यात आले आहे. यात गाव निहाय बपेरा, ढोरवाडा व बोरगाव येथे एक, बाम्हणी, चुल्हाड, देवरीदेव, गर्रा बघेडा, धुटेरा, हरदोली (आ), कर्कापुर, खापा, कोष्टी, मच्छेरा, मांगली (दे), परसवाडा, साखडी, सिहोरा, तामसवाडी, उमरवाडा, येदरबुची, कारली, परसवाडा येथे दोन विहिरी, आलेसुर, चारगाव, चिखली, देव्हाडी, डोंगरी बु., धनेगाव, हसारा, कुरमुडा, मांगली, मोहगाव, पाथरी, पवनारा, पवनारखारी, पिपरा, पिटेसुर, राजापुर, रनेरा, रुपेरा, सिंदपुरी, सितासावंगी, सोरना, टेमनी येथे तीन विहिरी, आंबागड, बोरी, चुल्हारडोह, दावेझरी, देवसर्रा, हिंगणा, खरबी, महालगाव, मुरर्ली, सोनेगाव, सुकळी, वाहनी येथे चार विहीरी, डोंगरला, कवलेवाडा, मिटेवानी, नाकाडोंगरी, पांजरा, सिलेगाव येथे पाच विहिरी, चांदपुर, चिचोली, देवनारा, गोबरवाही, गोंदेखारी, गुडसे, हरदोली, खैरलांजी, लोभी, लोहारा, मांडगी, मोहाडी, मोहगाव (ख.), पचारा येथे सहा विहिरी, आसलपानी, आष्टी, रोंघा येथे सात विहिरी, चिखला येथे १० तर येरली येथे ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान बाळापुर, बपेरा (सि.), बिनाखी, गोंडीटोला, नवरगाव, पवनारा, पिपरी (चुन्ही), सितेपार, सोंड्या, स्टेशनटोली, सुकडी (नकुल), सुसुरडोह, तुकडा, वारपिंडकेपार अशा ११ गावांचे शेतकऱ्यांना विहिर मजुरींचे प्रस्ताव आले नसल्याने नियोजन तयार करण्यात आले नाही. यामुळे या गावातील शेतकरी विहिर बांधकामाला मुकणार आहेत.