शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन पुनर्परीक्षार्थ्यांची लूट

By admin | Updated: July 13, 2016 01:41 IST

विद्यापीठाच्या नवीन शुल्क निर्धारण निर्णयाप्रमाणे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षार्थी

विद्यापीठ नियमांची पायमल्ली : एका विषयासाठी सर्वच विषयांचे परीक्षा शुल्क भंडारा : विद्यापीठाच्या नवीन शुल्क निर्धारण निर्णयाप्रमाणे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षार्थी म्हणून ज्या विषयाची परीक्षा देण्यासाठी अर्ज करावयाचे आहे, त्याच विषयाचे निर्धारित शुल्क संबंधित महाविद्यालयाने त्या विद्यार्थ्याकडून घेणे आवश्यक आहे. परंतु महाविद्यालयीन प्रशासन विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली करीत आताही सरसकट परीक्षा शुल्क वसूल करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पदवी महाविद्यालयात पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सर्रास आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे. बी.काम. पदवीच्या अभ्यासक्रमातील एका विद्यार्थ्याने आपले नाव उघड न करण्याचा अटीवर सांगितले की, एका विषयात अनुत्तीर्ण असल्यास विद्यापीठाचा शुल्क ५० रूपये तसेच कॉलेजचा शुल्क मिळवून एकूण ९० रूपये शुल्क घेणे आवश्यक होते. परंतु त्या विद्यार्थ्यांकडून ४५० रूपये शुल्क सरसकट वसूल करण्यात आले. हा प्रकार म्हणजे विद्यापीठातील नियमांचे सर्रास उल्लंघन करणारा आहे. सरसकट अधिकचे परीक्षा शुल्क वसूल करण्याचा प्रकार जवळपास सर्वच पदवी महाविद्यालयात घडत आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. शैक्षणिक सत्र २०१५-१६ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे ३१ डिसेंबर २०१५ रोजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क घेण्यासाठी विषयनिहाय व पेपर संख्येनुसार शुल्क निर्धारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची अधिसूचना १६ फेब्रुवारी २०१६ रोजी काढून सर्व पदवी महाविद्यालयांना पाठविण्यात आले. तसेच शुल्क निर्धारणसंबंधीची माहिती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्याचे निर्देशही दिलेले आहेत. व्यवस्थापन समितीने निर्धारित केल्याप्रमाणे प्रतिपेपर मागे निम्न शुल्क आकारण्यात आले आहे. त्यात ग्रंथालय विज्ञान प्रतिपेपर १३० रूपयेप्रमाणे, कला स्नातक (बीए) ७५ रूपये, वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) ५० रूपये, विज्ञान स्नातक (बीएससी भाग-१) ७५ रूपये, बीएससी भाग २, ३ साठी १२५ रूपये, बीए अ‍ॅडीशनल १२५ रूपये, सीएसडब्ल्यू १५० रूपये, इतर अंतर्राष्ट्रीय भाषा पदवी अभ्यासक्रम ३२५ रूपये, बीएसडब्ल्यू भाग १ साठी १६० रूपये, बीएसडब्ल्यू भाग २ व ३ साठी १४० रूपये, बीएससी (गृह विज्ञान) ७५ रूपये, स्नातकोतर पदवी २००रू., एमएससी (गृह विज्ञान) २५० रूपये, गांधीयन विचार स्नातकोतर १६५ रूपये, एमएसडब्ल्यू २२५ रूपये, बीलिब १४० रूपये, एमलीब १६० रूपये, यानुसार एका पेपर मागे शुल्क घेण्याचे नियम आहेत. तसेच सदर अधिसूचना प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावणे आवश्यक नाही, असेही माहीत झाले आहे. हा गैरप्रकार थांबविण्यात यावे, अशी मागणी पदवीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)