भंडाऱ्यात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: December 26, 2016 00:54 IST2016-12-26T00:54:25+5:302016-12-26T00:54:25+5:30

तंबाखू भंडारा : नगर प्रतिनिधी: दुचाकी, मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी भंडारा शहरासह जिल्हाभरात आठवडाभरात धुमाकूळ घातला आहे.

The roar of thieves in the store | भंडाऱ्यात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ

भंडाऱ्यात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ

पोलीसांची गस्त नावाचीच: पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज
भंडारा : तंबाखू भंडारा : नगर प्रतिनिधी: दुचाकी, मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी भंडारा शहरासह जिल्हाभरात आठवडाभरात धुमाकूळ घातला आहे. भंडारा शहराच्या मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी रविवारी तीन मोबाईल चोरुन नेले. यासह दुचाकी, घरफोडीच्या घटना वाढतच आहेत.
सुरेश बारई रा. विद्यानगर भंडारा, अशोक हुमणे रा. आंबेडकर वॉर्ड भंडारा व अन्य एकाचा मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेला. यापुर्वी भंडारा शहरातून अतिकूर अमिनूर रहमान रा. टिळक वॉर्ड भंडारा, राममंदिर वॉर्डातील रंजीत वैकुंट पात्र, शिवाजी नगरातील रहिवासी दिपक महादेव जांगडे, स्रेहानगर येथील कुणाल चिटघरे यांच्या मालकीची दुचाकी चोरुन नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद आहे. मात्र अद्यापही चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत. मोठा बाजार व बसस्थानक परीसरात चोरटे सक्रीय असून अनेकांना गंडविल्याच्या घटना यापुर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र या संवेदनशील परीसरात पोलीस तैनात ठेवणे गरजेचे असताना पोलीस प्रशासनाकडून ते केले जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. शहर परिसरात घडलेल्या लूटमारी व चोरीच्या घटना पाहिल्या तर पोलिसांची गस्त शिथिल झाल्याचे जाणवते. राजरोसपणे चोऱ्याचे प्रकार घडल्यामुळे पोलिसांची झोपच उडाली. हिवाळ्यात प्रतिवर्षी चोऱ्यांचे प्रकार घडतात. त्यामुळे या काळात अधिक प्रभावी गस्त घालणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)

तक्रारीत वाढ: कारवाई नगण्य
जिल्ह्यात गुन्ह्याचा आलेख वाढतच आहे. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. बोटावर मोजण्याइतक्याच गुन्ह्याचा छळा लावण्यात पोलीसांना यश येते. अनेक प्रकरणे आजही अनेक वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. चोरांवर पोलीसांचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे. गुन्ह्याचा छळा लागल्यास उदोउदो करण्यात येतो. मात्र अनेक घटनांतील चोरटे अद्यापही सापडलेले नाहीत. पोलीसांना प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: The roar of thieves in the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.