रस्ता सुरक्षा शिस्तीचा भाग व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:24+5:30

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मनिष कोठारी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा व एसटी महामंडळाचे गजानन नागुलवार उपस्थित होते.

Road safety should be part of the discipline | रस्ता सुरक्षा शिस्तीचा भाग व्हावा

रस्ता सुरक्षा शिस्तीचा भाग व्हावा

Next
ठळक मुद्देअरविंद साळवे : भंडारा येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अधिकार व हक्कांबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत असतात, ते असायलाही हवेत. मात्र आपल्या कर्तव्याबाबत आपण फारसे गंभीर दिसत नाही. कायद्याचे कसोशीने पालन करणे हे सुद्धा आपले मूलभूत कर्तव्यच आहे. मोटर वाहन कायदा हा आपल्याच भल्यासाठी असून रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा व शिस्तीचा भाग व्हावा असे प्रतिसादन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मनिष कोठारी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा व एसटी महामंडळाचे गजानन नागुलवार उपस्थित होते.
अतिशय लहान वयात आईवडील आपल्या पाल्यांच्या हाती वाहन देतात ही बाब चुकीची असल्याचे नमूद करून अरविंद साळवे म्हणाले, आपल्या जिल्ह्यात वाहनांच्या तुलनेत परवानाधारक कमी आहेत यावरून अनेक जण विना परवाना वाहन चालवित आहेत हे सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. विनापरवाना वाहन चालविणे बेकायदेशीर तर आहेच सोबतच अपघाताला निमंत्रण देणारे आहे, असे ते म्हणाले. मोटर वाहन कायदा हा आपल्या भल्यासाठी असून दुचाकी चालवितांना हेल्मेट व चार चाकी चालविताना सीट बेल्ट आवश्य लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
रस्ता सुरक्षा हे एका दिवसाचे अभियान नसून नियमित आचरणात आणावी अशी जीवन सुरक्षा प्रक्रिया असल्याचे अरविंद साळवे यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व गजानन नागुलवार यांची यावेळी भाषणे झाली.
राज्य परिवहन महामंडळात विना अपघात २५ व त्याहून अधिक वर्ष सेवा करणाऱ्या वाहकांचा या यावेळी सत्कार करण्यात आला.  यावेळी उपस्थितांचे आभार वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा स्थितीत रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे.

कायद्याचे पालन करा
कायदे पाळण्याबाबत आपण फार गंभीर राहत नसल्याचे नमूद करून मनीषा कोठारी म्हणाले, कायद्याचा आदर करायला पाहिजे. नागरिक म्हणून आपल्या हक्काबाबत जागृत तर असावेच सोबतच कर्तव्याची सुद्धा जाणिव ठेवावी. रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम पाळण्याची नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधिक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अन्य कायद्याबाबतीत ही माहिती दिली. व सुरक्षित वाहन चालविण्याचा सल्ला दिला.

Web Title: Road safety should be part of the discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.