रस्ता दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात

By Admin | Updated: January 27, 2015 23:28 IST2015-01-27T23:28:26+5:302015-01-27T23:28:26+5:30

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी अंतर्गत असलेल्या खडकी पालोरा ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी मंजूर झाले. मात्र कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

Road repair work in the cold storage | रस्ता दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात

रस्ता दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात

युवराज गोमासे - करडी पालोरा
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी अंतर्गत असलेल्या खडकी पालोरा ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी मंजूर झाले. मात्र कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पार एैसीतैसी झाली आहे. रस्त्यावर दोन मोठे अपघात झाले. १५ दिवसापूर्वी खडकी येथील एका मुलीचा अपघातात मृत्यू झाला. परंतु विभाग जाणे व्हायला तयार नाही. आणखी बळी हवे आहेत काय? विभाग आणि ठेकेदाराला असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
खडकी ते पालोरा ३ कि.मी. अंतरामध्ये मोजून ३५० खड्डे पडले आहेत. रस्ता आहे की मृत्यूचा द्वार हे समजण्याअगोदर वाहन चालक खड्ड्यात कोसळतो. विभागाला मात्र काहीही देणे घेणे वाटत नाही. शासनाने सदर कामाला दोन महिन्यापूर्वीच मंजूरी दिली आहे. पॅचेसचे काम मंजूर करून ६ लाखाचा निधीही दिला आहे. संबंधित ठेकेदाराला कामाचे कंत्राट झाले असताना बांधकामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. ठिकठिकाणी रस्ता उखडला असून गिट्टी सर्वदूर पसरली आहे. खोल खड्डे, आडव्या नाल्या रस्त्यावर पडल्याने वाहन चालक रस्त्यावरून वाहने न चालविता काठाने चालवित आहेत. काही खड्यांजवळ चार ते पाच ठिकाणी गिट्टी टाकली गेली असून संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आला आहे. वाहने चालविणे फार धोक्याचे काम होऊन बसले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. वाहने वारंवार बिघडत असून पंक्चर होणे, इंधनाची नासाडी होणे, प्रवाशांच्या वेदना होणे नेहमीच बाब होऊन बसली आहे. सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असून सत्ता पक्षाचे लोक शब्द काढायला तयार नाहीत. सत्ताधारी पक्षांनी साधलेली चुप्पी दु:खदायक आहेत. कसे येणार अच्छे दिन? कुठे आहेत नागरिकांसाठी अच्छे दिन? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जबाबदारी स्वीकारण्यास लोकप्रतिनिधी घाबरत आहेत. आतापर्यंत इतरांना दोष देणारे, मोठमोठी भाषणे ठोकणारे या विषयावर बोलत नाहीत, ही शोकांतिका आहे. या रस्त्यावर दोनदा मोठे अपघात घडले. १५ दिवसापूर्वी घरासमोर खडकी येथील मुलीचा खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकाकडून हकनाक जीव गेला. ठेकेदाराची मनमानी हा चिंतेचा विषय असला तरी सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा जवळचा व तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी असल्याने अधिकारी कंत्राटदाराचा मनमानी कारभार खपवून घेत आहेत. रस्ता मात्र नागरिकांना हैराण करीत आहे.

Web Title: Road repair work in the cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.