गोबरवाही आरोग्य केंद्रासमोरील रस्ता खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:28+5:302021-07-11T04:24:28+5:30
तुमसर-कटंगी आंतरराज्य रस्ता क्रमांक ३५६ गोबरवाही येथील मुख्य चौकात खड्डेमय झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे पडल्याने ...

गोबरवाही आरोग्य केंद्रासमोरील रस्ता खड्डेमय
तुमसर-कटंगी आंतरराज्य रस्ता क्रमांक ३५६ गोबरवाही येथील मुख्य चौकात खड्डेमय झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्णांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. रुग्णवाहिका तेथून जाताना मोठी अडचण निर्माण होते. प्रसूती महिलांचा यामुळे जीव धोक्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराशेजारीच लहान-मोठी दुकाने आहेत. दुकानात येणाऱ्या ग्राहकांची वाहने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराशेजारी ठेवली जातात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन जाताना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने उसळतात. अशा वेळी येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
डोंगरी बुजरूक, सीतासावंगी व पुढे नाकाडोंगरी येथे जाताना हा मुख्य चौकातील रस्ता आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहनचालक खड्डे चुकवताना येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आणि बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.