वनविभागाच्या जागेत रस्ता बांधकामाचे खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:47 IST2017-11-24T23:46:49+5:302017-11-24T23:47:27+5:30
तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

वनविभागाच्या जागेत रस्ता बांधकामाचे खोदकाम
मोहन भोयर ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. तत्पूर्वी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी येथे काम बंद केले होते. नंतर काम सुरू करण्यात आले. त्यानंतर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हे विशेष.
तुमसर तालुक्यातील सोदेपूर-खैरीटोला दरम्यान ६ कि़मी. लांबीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात येत आहे. येथे कंत्राटदाराला साडे सात मीअर रूंदीमध्ये रस्ता तयार करायचा होता. मात्र कंत्राटदाराने वनविभागाच्या हद्दीतील जागेत रस्ता तयार करत खोदकाम केला आहे.
याची माहिती प्राप्त होताच तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी माहिती प्राप्त होताच मोक्का चौकशी करून संबंधित कंत्राटदाराविरूद्ध वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सध्या काम बंद करण्याचे आदेशही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कंत्राटदाराला दिले. घनदाट जंगलातून हा रस्ता जातो. रस्ता तयार करण्यापूर्वी संबंधित विभाग प्रत्यक्ष देखरेख करून त्यार नियंत्रण ठेऊन कामे पार पाडतात. येथे तसे झाल्याचे दिसत नाही.
मुख्यमंत्री सडक योजनेचे स्वतंत्र कार्यालय, भंडारा येथे जिल्हा मुख्यालयी आहे. त्या विभागाचे कनिष्ठ बांधकाम अभियंता येथे कामे पाहतात. जिल्हास्तरावर वरिष्ठ अधिकारी आहेत. सुमारे अडीच कोटींचे हे संपूर्ण कामे असल्याची माहिती आहे. रस्ता ही ग्रामीण जीवनाची लाईफ लाईन आहे. रस्त्याची कामे सुरू केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी मोक्यावर गेले होते. तीन दिवसापुर्वी प्रकरण अंगलट येईल म्हणून तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पुन्हा चौकशी करीता मोक्यावर गेले होते. मंगळवारी त्यांनी काम बंद करण्याचे निर्देश देऊन संबंधित कंत्राटदाराविरूद्ध वनअधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही तत्परता रस्ता बांधकाम सुरू करण्यापूर्वी कां दाखविली नाही हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलातून रस्ता तयार करतानी वनविभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. वनविभागाजवळ कर्मचाºयांची फौज आहे हे विशेष. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास अनियमितता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकामानंतर येथे वन विभागाला जाग आली. कर्तव्यात कसूर प्रकरण शेकण्याची येथे शक्यता आहे.
सोदेपूर-खैरीटोला रस्ता बांधकाम प्रकरणी वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्याचे प्रथमदर्शनी आढळले. याप्रकरणी मोका चौकशी केल्यानंतर संबंधित मंत्राटदाराल काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तथा कंत्राटदारावर भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल.
-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्रअधिकारी तुमसर.