चौफुलीला जोडणारा रस्त्याचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:55+5:302021-04-22T04:36:55+5:30
तुमसर : रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्ग व तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा चौफुलीला जोडणारा रस्त्याचा तिढा कायम आहे. एका खासगी व्यक्तीने ...
तुमसर : रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्ग व तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा चौफुलीला जोडणारा रस्त्याचा तिढा कायम आहे. एका खासगी व्यक्तीने सदर जागा आपली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने भूमिअभिलेख कार्यालयाकडून दस्तऐवज जमा केले. येथे सदर रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्ग व भंडारा-तुमसर राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्यावर महामार्ग प्राधिकरणाने रस्ता बांधकाम करताना खोदकाम केले होते परंतु महामार्ग प्राधिकरणाने यावर एका दुकानदाराने आक्षेप घेतल्यानंतर खोदकाम बुजविले.
सदर दुकानदाराने ही जागा आपली असल्याचा दावा केला होता.
त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने भूमिअभिलेख कार्यालयाकडून संबंधित रस्त्याचे दस्तऐवज घेतले. सदर दस्तऐवजात संबंधित जागेची मालकी महामार्ग प्राधिकरणाची आहे असा निष्कर्ष काढला. रस्ता खोदकाम करताना संबंधित विभागाने दुकानदाराने आक्षेप घेतल्यानंतर भूमिअभिलेख कार्यालयाकडून दस्तऐवज जमा केले.