राज्य मार्गावरील रेल्वे फाटक बंदने अर्धा तास वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:20 IST2018-11-11T21:19:47+5:302018-11-11T21:20:13+5:30
दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती.

राज्य मार्गावरील रेल्वे फाटक बंदने अर्धा तास वाहतूक कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. उड्डानपूल बांधकामामुळे केवळ एकच पोचमार्ग सुरु असल्याने एकाच मार्गावरुन वाहनांची ये-जा सुरु आहे. लहान मुले, महिला व वृध्द पुरुषांना फाटक बंदचा मोठा फटका बसला.
तुमसर-गोंदिया राज्य मार्ग मोठा वर्दळीचा आहे. चार वर्षापूर्वी येथे उड्डान पुलाचे काम सुरु करण्यात आले. कासवगतीने सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दर सात मिनिटाला येथे रेल्वे फाटक बंद होते. २४ तासात १८० ते २०० रेल्वे गाडया येथून जातात. फाटक बंद १० ते १५ मिनिटे राहते. रविवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे फाटक बंद १० ते १५ मिनिटे राहते. रविवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे फाटक बंद करण्यात आली. सुमारे अर्धा तास फाटक बंद होती. दोन मालगाडया कासवगतीने येथून रवाना झाल्या. रविवारी देव्हाडी येथे आठवडी बाजार असतो. सध्या दिवाळी निमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
एक ते दीड कि.मी. वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. कासवगतीने वाहनधारकांनी वाहने काढली. यथे ट्रॅफिक संचालन करणारे कुणीच राहत नाही. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी होण्यास विलंब लागतो. गोंदिया मार्गावरील एकच पोचमार्ग सुरु आहे. तुमसरकडे जाणाराही एकच पोचमार्ग सुरु आहे. त्यामुळे अरुंद पोचमार्गावरुन दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरून धुळीचा दुसरा मोठा त्रास येथे सुरुच आहे. पोचमार्गावर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत.
आॅटो सिग्नल प्रणालीमुळे स्वयंचलीत रित्या रेल्वे फाटक बंद व सुरु होते. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. रेल्वेने अद्याप उड्डाणपूलाचे (गडर) कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे उड्डाणपूलांची कामे केव्हा पूर्णत्वास येथील असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. केंद्र व राज्य शासनाने येथे उड्डाणपूलाकरीता निधी दिला आहे. हे विशेष.