लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोट्यवधी रूपये खर्चून वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल वारंवार क्षतिग्रस्त होत असल्यामुळे या पुलावर दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. या फटका वाहनचालकांना होत आहे.मुंबई-हावडा मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा भंडारा शहरातून जातो. मागील १० वर्षांपासून या मार्गावर असलेल्या पथकर नाक्यावर वसुली सुरू आहे. आजवर पुल बांधण्यासाठी लागलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने पथ कर वसुल करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.असे असताना आतापर्यंत वैनगंगा नदीवरील पुलाला काहीही झाले नसताना पुल क्षतिग्रस्त असल्याचे सांगण्यात येऊन चार महिन्यापूर्वी डाव्या बाजुला दोन ठिकाणी डागडुजी करण्यात आली तर चार दिवसांपासून उजव्या बाजुला दोन ठिकाणी डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. आता पुलाच्या दुरुस्तीच्या नावावर टोलची मुदत वाढविण्याचा तर हा प्रकार नसावा ना? असा आरोपही आता भंडारावासियांनी केला आहे.
नदीवरचा पूल वारंवार क्षतिग्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:42 IST
कोट्यवधी रूपये खर्चून वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल वारंवार क्षतिग्रस्त होत असल्यामुळे या पुलावर दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. या फटका वाहनचालकांना होत आहे.
नदीवरचा पूल वारंवार क्षतिग्रस्त!
ठळक मुद्देनागरिकांना त्रास : वैनगंगा पुलावर वाहनांच्या रांगाच रांगा