‘कॅश ट्रान्सफर’चा धोका कायम

By Admin | Updated: May 18, 2015 00:26 IST2015-05-18T00:26:01+5:302015-05-18T00:26:01+5:30

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या....

The risk of 'cash transfer' has been threatened | ‘कॅश ट्रान्सफर’चा धोका कायम

‘कॅश ट्रान्सफर’चा धोका कायम

सहकारी बँका, पतसंस्थांनी काळजी घेण्याची गरज
बंदूकधारी सुरक्षा रक्षक आवश्यक
दररोज कोटींची वाहतूक
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये दिवसाआड सुमारे पंधरा लाखांची एटीएममध्ये आठ दिवसांमिळून इतकी रक्कम टाकली जाते. जिल्ह्यात सर्व एटीएमचा विचार करता दिवसाला काही कोटी रुपये बँकांना लोड करावे लागतात. राष्ट्रीयकृत बँककाकडे स्वत:चे सिक्युरिटी वाहन व सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्यांच्यापुढे सुरक्षेचा तितकासा प्रश्न नसतो. मात्र, सहकारी बँका, पतसंस्था, त्यांचे अल्पबचत प्रतिनिधी यांच्याकडून केली जाणारी कॅश ट्रान्सफर फारशी सुरक्षित नसते. येथे धोका होऊ शकतो.
साध्या वाहनांचा वापर धोकादायक
भंडारा जिल्ह्यातील काही सहकारी बँकानी स्वत:ची एटीएम सेवा सुरु केली आहे. या सर्व एटीएममध्ये दररोज कोट्यवधीची कॅश जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये पाठवली जाते. त्यांच्याकडे हा दररोजचा प्र्रकार असला तरी सुरक्षा यंत्रणेच्या गाफीलपणामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सहकारी बँक शहराअंतर्गत शाखंमध्ये कॅश देतात. त्यासाठी अनेका बँका साध्या वाहनांचा वापर करतात हे फारच धोकादायक आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काय?
चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक पैसे, महत्त्वाची कागदपत्रे वा दागिने बँकामध्ये ठेवतात. आपला पैसा बँकेतील तिजोरीत सुरक्षित आहे. या भावनेत खातेदार निश्चित असतात. मात्र अलीकडे घरफोड्याबरोबर बँक, पतसंस्था फोडून चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या घटना टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार अनेक राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका, पतसंस्थामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेक बँका, पतसंस्थांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वॉचमन, सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्मसह सुरक्षेची सर्व प्रकारची यंत्रणा बँकामध्ये चालू स्थितीत असेलच हे सांगता येत नाही.
कॅश ने-आण करण्यासाठी खास नियमावली
राष्ट्रीयकृत बँकाना कॅशची केव्हाही गरज भासते, कारण त्यामध्ये विविध सहकारी बँकाची खाती असतात. तसेच त्यांच्या ग्राहकांनाही केव्हाही पैशांची निकड भासू शकते, त्यामुळे त्यांना कॅशची तजवीज करुन ठेवावी लागते. या बँकानी जर आरबीआयकडून कॅश मागविली तर ज्या कोणत्या वाहनातून कॅशची ने-आण केली जाते. त्या वाहनांच्या सुरक्षितेसाठी केवळ पोलिसांचाच बंदोबस्त मागविला जात असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.
अशी घ्या खबरदारी
बँकेतील कॅश ट्रान्झिटसाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनाची बॉडी इतर वाहनापेक्षा मजबूत असावी. कारण काही अनुचित प्रकार घडला तरी या वाहनातील कॅश सहजासहजी हातात पडू नये. अशी तिची रचना असावी. या वाहनाबरोबर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक वा दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक, एक जबाबदार अधिकारी, एक शिपाई, एक क्लार्क अशी यंत्रणा आवश्यक आहे.
सामान्यत: राष्ट्रीयकृत बँक कोणताही धोका न पत्करता वाहन व पुरेपुर यंत्रणेशिवाय कॅश ट्रान्झिट करत नसल्याचे दिसून येते. सहकारी बँकानी मात्र या बाबतीत आणखी सतर्क व्हायला हवे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The risk of 'cash transfer' has been threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.