पक्ष्यांना वाचवण्यासाठी ‘बढते कदम’चा पुढाकार
By Admin | Updated: April 24, 2017 00:56 IST2017-04-24T00:56:46+5:302017-04-24T00:56:46+5:30
तहानलेल्यांना पाणी पाजून अनेक लोक पुण्य कमावण्याची गोष्ट आपण अनेक वेळा ऐकत आलो आहे.

पक्ष्यांना वाचवण्यासाठी ‘बढते कदम’चा पुढाकार
तुमसर शहरात मातीच्या पानवठ्याचे वाटप : जागृत युवकांचा आगळावेगळा उपक्रम
तुमसर : तहानलेल्यांना पाणी पाजून अनेक लोक पुण्य कमावण्याची गोष्ट आपण अनेक वेळा ऐकत आलो आहे. मुक्या पक्ष्यांना घरुन हाकलण्याचे प्रकार ही अनेक वेळा पाहावयास मिळतात. परंतु याच मुक्या पक्ष्यांची काळजी घेणाऱ्यांची संख्या मात्र क्वचितत पाहावयास मिळते. वाढत्या रखरखत्या उन्हात अनेक पक्षी पाण्यापासून तडफडत जीव जातो. अशा मुक्या पक्षांना मात्र पाणी पाजण्यासाठी आज तुमसरातील सिंधी समाजातील काही जागृत युवक ‘बढते कदम’चा उपक्रम राबवित आहेत.
शहराच्या अनेक भागात जावून हे तरूण, मातीपासून निर्मित लहान पाणवठे वाटप करण्याचा उपक्रम राबवित आहे. यात शहराच्या अनेक भागातील झाडावर तर कुणाच्या घरी जावून पानवठयाचे वाटप केले जात आहे. यात डॉ. गोंविद कोडवाणी, माजी नगरसेवक सुनिल लांजेवार, अनील कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थित ‘बढते कदम’ या संगठनेने पानवठयाचे वाटप केले.
यावेळी संघटनेचे दिलीप फुलवधवा, अॅड. मनिष रावलानी, अॅड. दिपक रावलानी, बंटी आसवानी, बंटी नरसिंगानी, कैलास ईसरानी, नितिश गुरुवानी, दुर्गेश श्रीचंदानी, मनोज आमुदानी, अमित पोपटानी, कमलेश माधवानी, किशन रोचवानी, निखिल फुलवधवा, तरुण रंगवानी, सच्चानंद माधवानी, या कार्येकर्त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेत परिश्रम घेतले व पानवठयांचे वाटप केले. (तालुका/शहर प्रतिनिधी)