सुरळीत वाहतुकीसाठी रिंगरोडची गरज
By Admin | Updated: July 3, 2014 23:23 IST2014-07-03T23:23:56+5:302014-07-03T23:23:56+5:30
अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण यामुळे तुमसर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिहोरा, नाकाडोंगरी आणि भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणारा नवीन रिंगरोड तयार करण्यासाठी सर्व

सुरळीत वाहतुकीसाठी रिंगरोडची गरज
अपघात वाढले : किसान गर्जनाचे राजेंद्र पटले यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन
भंडारा : अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण यामुळे तुमसर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिहोरा, नाकाडोंगरी आणि भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणारा नवीन रिंगरोड तयार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू असा विश्वास किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी व्यक्त केला.
नवीन रिंगरोडसाठी संबंधित विभागाच्या अभियंत्याकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पटले यांनी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केलेअ ाहे. केंद्रीय मंत्र्यांनी निवेदनाची दखल घेतली असून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
दाटीवाटीच्या तुमसर शहरातीलरस्ते अरुंद असून वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. जुने बसस्थानक ते बावनकर चौक व पुढे इतर मार्गावरून दुचाकीवाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंतापदावर कार्यरत असताना राजेंद्र पटले यांनी स्वत: तयार केलेला रिंगरोडचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांना सादर केला होता. या कामाला त्यावेळी मंजुरी मिळाली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने प्रस्तावित रिंगरोड लालफीतशाहीत अडकून पडला. गेल्या ८ वर्षापासून पटले रिंगरोडसाठी प्रयत्नरत असून साबांविकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले असून त्यावर कारवाई सुरु आहे. परिणामी, शहरात रिंगरोड होईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यासाठी अखेरपर्यंत लढा देऊ, असे राजेंद्र पटले यांनी सांगितले.
साबांविचे उपविभागीय कार्यालय तुमसर शहरातून हलविण्यात आल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर कार्यालय परत आणण्यासाठी साबांविचे सचिव मुखर्जी यांना निवेदन देण्यात आले आहे. कार्यालयाचे स्थानांतरण आणि रिंगरोडची निर्मिती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून प्रसंगी तीव्र आंदोलन उभारे जाईल असा इशारा पटले यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)