‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रम
By Admin | Updated: July 28, 2016 00:39 IST2016-07-28T00:39:18+5:302016-07-28T00:39:18+5:30
बाहेर पाऊसधारा आणि सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष युवती, महिला, पुरूष सारेच चिंबचिंब झाले, ..

‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रम
पावसाच्या गीताने सखी चिंब : कलर्स प्रस्तुत सखी मंचचा ‘आया सावन झुमके’
भंडारा : बाहेर पाऊसधारा आणि सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष युवती, महिला, पुरूष सारेच चिंबचिंब झाले, असा हा अविस्मरणीय दिवस आणि रंगलेला गाण्याचा कार्यक्रम निमित्त होते.
कलर्स प्रस्तुत सखी मंचच्या वतीने आयोजित रिमझिम गाणी-झलक सुहानी कार्यक्रमाचे भंडारा येथील मुस्लिम लायब्रेरी सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफीसाहेब, किशोर कुमार, गानकोकीळा लता मंगेशकर आदींच्या आवाजातील गाणी नागुपरातील उत्कृष्ट गायक कलावंतांनी सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्टय ठरले. कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश समथृ, शाखा व्यवस्थापक मोहन धवड, वैशाली खराबे, शिवानी काटकर, गिष्मा खोत, आदित्य अल्लडवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
'रिमझिम गाणी झलक सुहानी या खास पावसाच्या गीतांचा कार्यक्रम सुरू झाला आणि एकाहून एक सरस गाणी सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात गणेशाच्या भक्ती गिताने झाली. नागपुरची गुणी आणि सुरेख गायीका अंकिता टकले हिच्या गोड आवाजात सुर निरागस हो या गिताने प्रचंड टाळ्या घेतल्या नंतर सुप्रसिद्ध गायक आणि गिनिजवर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुनिल वाघमारे यांच्या 'आज मौसम बेईमान है बडा' या गीताने वातावरण प्रसन्न झाले.
अमित गणवीर यांनी मला वेड लागले' हे गीत सादर करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. सुनिल वाघमारे यांनी 'मेघा रे मेघा रे' हे गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा घेतली. सैराट चित्रपटातील 'झिंग झिंग झिंगाट' या गितावर सखींनी ताल धरला व वन्स मोअर म्हणून बेधुंद नाचल्या अंगिता टकले यांनी 'ही गुलाबी हवा वेड लावी जीवा' ही गीते सादर केली. संकल्पना हार्माेनी ईव्हेंन्टचे श्री राजेश समर्थ यांची होती तर वादकांमध्ये श्री नंदु गोहाने, राजा राठोर आणि पंकज यादव यांनी साथ संगत केली.
कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले तर आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. सुहासिनी अल्लडवार, अर्चना गुर्वे, कांता बांते, कल्पना डांगरे, रेखा गिऱ्हेपुंजे, मंगला डहाके, मंगला क्षीरसागर, वंदना दंडारे, अल्का खराबे, सोनाली तिडके संध्या रामटेके, मंदा पडोळे, दिपा टेंभुर्णे, श्रद्धा डोंगरे, पोर्णिमा फटिक, संगिता भुजाडे, शालिनी सुर्यवंशी, मनिषा रक्षिये, प्रतिभा खोब्रागडे व ललीत घाटबांधे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)
‘झलक दिखला जा नृत्य स्पर्धा’
कलर्स प्रस्तुत सखीमंच 'रिमझिम गाणे झलक सुहाने' या कार्यक्रमात कलर्स चॅनलवर सादर करण्यात येत असलेल्या 'झलक दिखला जा हॉट है' या डॉन्स शोवर आधारित नृत्य स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आणली. प्रथम १० सखींनी आपल्या नृत्याचे सादरीकरण दिले. त्यातील पाच उत्कृष्ठ नृत्यांगणांना निवडण्यात आले. या पाच नृत्यांगणांचा अंतिम सामना घेण्यात आला. तो खुप मनोरंजक ठरला. या पाच जणींना जॅकलेनच्या गाण्यावर जॅकलीनसारखे नृत्य करायचे होते. त्यात तीन सखींनी बाजी मारली. अनुक्रमे प्रथम पुजा पांडे, द्वितीय डॉ. विशाखा जिभकाटे, तृतीय डॉ. विभ्रता कापगते या विजया ठरल्या.
पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखलाजा हॉट है सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिवर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडल जॅकलीन फर्नाडिस सेलीब्रेटीज जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक करण जोहर, सुप्रसिद्ध कोरिओ ग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत धमाल करणार आहे. १२ सेलिब्रेटी या झलक दिखला जा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहे. ज्यात सुर्वीन चावला, करिश्मा तण्णा, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गिरा (चुटकी फेम) पुनम शहा, प्रियंका शहा (जुड्या बहिणी) हरपाल सिंग सोखी शेफ, हेली शहा, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनु माहेश्वरी असे दहा नामवंत प्राख्यात सेलीब्रेटी या शो चे आकर्षन आहे. पण जॅकलीन फर्नाडिसच्या या शोला एक ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरूप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट आहे.