नववधूने बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:41 IST2018-05-28T23:41:05+5:302018-05-28T23:41:16+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये गडेगाव मतदान केंद्रावर विवाहानंतर नववधुने मतदानाचा हक्क बजावून वधुघरी प्रयान केले.

नववधूने बजावला मतदानाचा हक्क
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये गडेगाव मतदान केंद्रावर विवाहानंतर नववधुने मतदानाचा हक्क बजावून वधुघरी प्रयान केले. माहेरीचे शेवटचे मतदान करतानी पतीला मतदान करण्यासाठी सोबत नेले व सायंकाळी नववधुने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माहेरच्यांनी नवरीला सार केले. गडेगाव येथील संजना सुरेश नंदेश्वर हिचा विवाह एकोडी येथील अतुल जागेश्वर वाघमारे यांंच्याशी आज दुपारी लाखनी येथे पार पडला. विवाहानंतरचे सर्व विधी पार पडल्यानंतर गडेगाव येथील जि.प. शाळेच्या मतदान केंद्रात जावून वधुने मतदानाचा हक्क बजावला आहे.