एक लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By Admin | Updated: September 25, 2014 23:18 IST2014-09-25T23:18:55+5:302014-09-25T23:18:55+5:30

विधानसभा निवडणुकात लाखनी तालुक्यातील १ लक्ष ३३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५१ हजार ७२ पुरुष मतदार व ४९ हजार ७६६ स्त्री मतदार मतदान करणार आहेत. साकोली विधानसभा

The right to vote for one to vote | एक लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क

एक लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क

चंदन मोटघरे - लाखनी
विधानसभा निवडणुकात लाखनी तालुक्यातील १ लक्ष ३३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५१ हजार ७२ पुरुष मतदार व ४९ हजार ७६६ स्त्री मतदार मतदान करणार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरण तयार करण्यात लाखनी तालुक्याची भूमिका महत्वाची आहे. तालुक्यात तीन व्यक्तींना साकोली क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेस, भाजपा व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यात मजबूत संघटन बांधणी आहे. लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदारांचा कल भाजपाकडे होता.लाखनी तालुका साकोली विधानसभा क्षेत्रात येतो. साकोली विधानसभा क्षेत्राचे दोनदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील सेवक वाघाये यांना १९९, २००४ च्या निवडणुकीत प्राप्त झाली. मुरमाडी (सावरी) येथील भाजपाच् या तिकीटावर उभे राहिलेले शिवराम गिऱ्हेपुंजे यांना १९९९ व २००४ च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. लाखनीतील सहकार महर्षी गोविंद निंबेकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते. दोन्ही निवडणुकात त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळाले. १९८० च्या निवडणुकीत केसलवाडा (वाघ)चे काशिनाथ वाघाये अपक्ष उमेदवार होते. त्यांना ११ हजार १७६ मत मिळाली होती. केसलवाडा (वाघ) येथील मधुकर बेदरकर १९७८ ला आमदार बनले होते. साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत लाखनीे शहराकडे दुर्लक्ष झाले. शहरातील एकाही काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांना आमदारकी मिळविता आली नाही. साकोली विधानसभा क्षेत्रावर साकोलीचे प्रभूत्व राहिले. शामरावबापू कापगते १९६७ व डॉ.हेमकृष्ण कापगते १९९० व १९९५ मध्ये आमदार राहिले. जनसंघाचे कार्यकर्ते व भाजपाचे नेते गोविंद निंबेकर यांच्यामुळे लाखनीचे नाव चर्चेत राहिले. त्यानंतर लाखनी शहरातील एकही नेतृत्व आमदाराकीपर्यंत पोहचू शकले नाही.
केसलवाडा राजकारण्यांचे गाव
तालुक्यातील केसलवाडा (वाघ) एक लहानशे खेडेगाव आहे. येथील मधुकर बेदरकर १९७८ ला साकोली क्षेत्राचे आमदार बनले होते. १९९९ व २००४ मध्ये सेवक वाघाये विजयी झाले. १९८० ला काशिनाथ वाघाये अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते.

Web Title: The right to vote for one to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.