वृद्धांनाही जगण्याचा अधिकार

By Admin | Updated: October 5, 2015 01:05 IST2015-10-05T01:05:24+5:302015-10-05T01:05:24+5:30

माणुसकी कमी होत आहे, नात्याची वीण सैल पडली आहे, वृध्द माता-पिता म्हणजे ओझं अशी भावना निर्माण झाली आहे.

The Right to Survival of the Aged | वृद्धांनाही जगण्याचा अधिकार

वृद्धांनाही जगण्याचा अधिकार

ज्येष्ठ नागरिक दिन : परिसंवादात ज्येष्ठांनी मांडल्या व्यथा
भंडारा : माणुसकी कमी होत आहे, नात्याची वीण सैल पडली आहे, वृध्द माता-पिता म्हणजे ओझं अशी भावना निर्माण झाली आहे. ‘हम दो हमारे दो’ या चौकोनात वृध्दांसाठी जागाच उरलेली नाही. आज भारतात जेष्ठांची संख्या १० कोटीच्या घरात आहे. पुढील २० वर्षात ही संख्या २० कोटीपर्यंत जाईल तेव्हा जेष्ठ नागरिकांच्या समस्या अधिकच जटील होतील. वृध्दांना सुध्दा जगण्याचा हक्क आहे. असा सुर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित परिसंवादातील वक्त्यांचा होता.
सिनिअर सिटीझन मल्टीपरपज असोशियसन भंडाराचे वतीने १ आॅक्टोबर या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड हाते. परिसंवादात माणीकराव रामटेके, एम.डब्लू. दहिवले, इंजि. रुपचंद रामटेके, आदिनाथ नागदेवे, विद्याधर रामटेके यांनी भाग घेतला. या गोष्टीचा जणू कुटूंब व समाजाला विसरच पडला आहे. त्यांनाही भावनीक आधार व प्रेमाची आवश्यकता आहे. कुटूंबानी अडगळ न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा व वृध्दानींही जनरेशन गॅप चे तत्वानी वारंवार कुटूंबाच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करु नये. वृध्द व जेष्ठ नागरीक आतापर्यंत कुटूंबासाठी जगलेत आता त्यांनी स्वत: साठी जे करायचे राहून गेले होते ते करून तसेच रक्ताची व रक्तापलीकडची नाती जपून आनंद साजरा करावा. त्यांनी विविध छंद, वाचन, पर्यटन, कला, कौशल्य, समाजसेवा, लेखन इत्यादी कार्यात स्वत:ला व्यस्त करावे. संचालन गुलशन गजभिये यांनी केले तर आभार रुपचंद रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी चिंतामण बोरकर, निर्मला गोस्वामी, कुंदा भोवते, प्रताप पवार, इत्यादीनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The Right to Survival of the Aged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.