भेल प्रकल्पाला नवसंजीवनी द्या
By Admin | Updated: May 12, 2015 00:32 IST2015-05-12T00:32:20+5:302015-05-12T00:32:20+5:30
शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या उद्देशाने भेल प्रकल्पाला मुंडीपार, ब्राह्मणी, खैरी या गावातील शेतकऱ्यांनी सुमारे ...

भेल प्रकल्पाला नवसंजीवनी द्या
शेतकरी हवालदिल : भेल बचाव संघर्ष परिषदेची मागणी, अनेकांचा अपेक्षाभंग
साकोली : शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या उद्देशाने भेल प्रकल्पाला मुंडीपार, ब्राह्मणी, खैरी या गावातील शेतकऱ्यांनी सुमारे ७७० एकर जमीन सरकारला हस्तांतरीत केली. मात्र, भेल प्रकल्प पूर्ण होण्याऐवजी तो गुंडाळण्यात येत असल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रकल्प त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी भेल बचाव संघर्ष परिषदेने केले आहे.
तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रकल्पाचे भुमिपूजन केले. कामही सुरु झाले. मात्र, भेल प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी भुमिहीन झाले तसेच बेरोगारही झाले आहे.
भेल प्रकल्प पूर्ववत सुरु करुन लवकर पूर्णत्वास नेण्याचे निवेदन केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांना उपविभागीय अधिकारीमार्फत देण्यात आले. या निवेदनात, केंद्र सरकारने निधी बंद केल्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले. भेल प्रकल्प सुरु होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी भेलचे काम पूर्ववत सुरु करावे. भेल सुरू झाल्यास जिल्हयातील अनेक बेरोजगाराना काम मिळेल व परिसरातील बेरोजगारी दूर होईल. शासनाने याची दखल घेऊन बंदवस्थेत असलेल्या कंपनीचे काम सुरू करावे, अन्यथा भेल बचाव संघर्ष परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाव्यापी आंदोलन करून प्रकल्पचे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी करण्यात येईल, अशी मागणी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय तुमसर यांनी केली.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. अजय तुमसरे, नामदेव लामकाने, राजकुमार पुराम, संतोष पुराम, कोमल कराटे, दादाराम लुटे, अशोक कुथे, तोषीक गेडाम, राजेश वरठे, मेघश्याम डोंगरवार, नरेश कुरंजेकर, मनोज करिये, राजेश भदाडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)