रिव्हर्स इंटरसिटीने तिरोडा, तुमसर, भंडारा थांबा वगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:00+5:302021-01-21T04:32:00+5:30
रिवा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता सुटून ती गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ मिनिटांनी इतवारी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ...

रिव्हर्स इंटरसिटीने तिरोडा, तुमसर, भंडारा थांबा वगळला
रिवा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता सुटून ती गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ मिनिटांनी इतवारी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी इतवारी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६.३० वाजता सुटणार असून रिवा येथे सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे. २०कोचची ही जलद प्रवासी गाडी आहे. सदर एक्स्प्रेस गाडीला सतना,कटनी, बालाघाट, गोंदिया येथे थांबा देण्यात आला आहे. नागपूर व्हाया गोंदिया, नैनपूर, बालाघाट असा या गाडीचा मार्ग आहे. उत्तर भारतात जाणारी एक महत्त्वपूर्ण गाडी ठरली आहे. कोरोना काळात प्रवाशांची संख्या कमी झाली होती. अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढत आहे. एक्स्प्रेस गाड्या तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठ्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा देण्याची गरज आहे. ही गाडी रिव्हर्स इंटरसिटी एक्स्प्रेस म्हणून ओळखली जात आहे.