आरटीओच्या कारवाईतून मिळाला ३४ लाखांचा महसूल

By Admin | Updated: December 12, 2015 00:35 IST2015-12-12T00:35:37+5:302015-12-12T00:35:37+5:30

शहरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचे नूतनीकरण व अन्य प्रकरणांमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या कारवाईत गत दोन महिन्यात ३४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Revenue of Rs 34 lakh received by RTO | आरटीओच्या कारवाईतून मिळाला ३४ लाखांचा महसूल

आरटीओच्या कारवाईतून मिळाला ३४ लाखांचा महसूल

दोन महिन्यातील कारवाई : रेल्वेस्थानक-बसस्थानक प्रिपेड सेवा
भंडारा : शहरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचे नूतनीकरण व अन्य प्रकरणांमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या कारवाईत गत दोन महिन्यात ३४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात ही कारवाई करण्यात आली असून १५ डिसेंबरपर्यंत आॅटोरिक्षा परवान्याचे नूतनीकरण करण्याची संधी देण्यात आली आहे.
राज्यातील रद्द किंवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवान्याचे नूतनीकरण करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शासन निर्णयाप्रमाणे कारवाई सुरु केली आहे. मागील दोन महिन्यांपासून यावर कार्य सुरु आहे. आॅटोरिक्षा वाहनधारकाने नोंदणी प्रमाणपत्र, पियुसी, एकरक्कमी कर, पर्यावरण कर, योग्यता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे परवाना नूतनीकरणाकरिता आवश्यक आहेत. ज्या आॅटोरिक्षांचे परवाना नूतनीकरणात दिरंगाई करण्यात आली. अश्यांवर विलंबापोटी प्रतिमाह १००रुपये प्रमाणे व शासकीय शुल्क २०० रुपये याप्रमाणे केलेल्या कारवाईत ९ लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यासह अन्य कारवाईत मिळालेला महसूलात भर पडून त्याचा एकूण निधी ३४ लाख रुपये एवढा आहे. आॅटोरिक्षा चालकांनी परवान्याचे नूतनीकरण करावे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Revenue of Rs 34 lakh received by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.