मृत्यूला परतवून ‘ती’ जगली २० वर्षे

By Admin | Updated: May 9, 2017 00:22 IST2017-05-09T00:22:24+5:302017-05-09T00:22:24+5:30

मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात.

By returning to death 'she' lived 20 years | मृत्यूला परतवून ‘ती’ जगली २० वर्षे

मृत्यूला परतवून ‘ती’ जगली २० वर्षे

अखेर श्वास संपला : नातू-पणतूंचा गोतावळा अनुभवला
राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात. परंतु एका वृद्धेने २० वर्षांपूर्वी मृत्यूला आलिंगन दिले. त्यातून ती परतही आली अन् तब्बल वीस वर्ष मृत्यूवर विजय मिळवून तिने आज सोमवारला अखेरचा श्वास घेतला. भागरथा ईश्वरकर, असे त्या वृद्धेचे नाव आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील किसन ईश्वरकर यांनी भागरथा यांच्याशी लग्न केले. पहिल्या पत्नीला तीन अपत्ये झाली. त्यानंतर भागरथाबाईचा मृत्यू झाला. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीवर प्रेम असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या पत्नीचेही नाव भागरथाच ठेवले. दोघांच्याही आयुष्यवाटा एकाच दिशेने सुखी समाधानाने निघत होत्या. किसन ईश्वरकर यांना दुसऱ्या पत्नीपासून तीन मुले व चार मुली झाल्या.
२५ वर्षापुर्वी किसन ईश्वरकर यांचे निधन झाले. त्यानंतर मुला-मुलींच्या मायेच्या सावलीने जगणारी भागरथा पांजरा (बोथली) येथील यशोदा नामक मुलीकडे भेटीला गेली. तिथेच भागरथाबाईची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून आता तिचे जगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही वेळानंतर डॉक्टरांनी भागिरथाला मृत घोषीत केले. मृत्यू झाला म्हणून भागरथाला रोहणा येथे स्वगावी नेण्यात आले. सगळ्या नातेवाईकांना मृत्यूची बातमी देण्यात आली. अंत्यविधीचा निरोपही देण्यात आला. सगळी मंडळी रोहणा येथे पोहोचली. अग्निसंस्काराचा सोपस्कार सुरु होता. अन् आश्चर्य बघा भागरथाने दीर्घ श्वास घेतला आणि एकच धावपळ उडाली.
बाई जीवंत आहे, असा कल्लोळ सुरु झाला. खरच भागरथा उठून बसली, हा सगळा प्रकार बघून तिलाही नवलच वाटले. भागरथाबाईने ‘याची देही याची डोळा’ मृत्यूचा सोहळा अनुभवला. तो प्रसंग दु:खाचा होता. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या आप्तेष्ठांनी दुखाची घटना सुखाच्या सोहळ्यात त्यावेळी अनुभवली होती.
त्यानंतर २० वर्ष भागरथाबाई अगदी ठणठणीत जगली. काल परवा तिला ताप आला. पण, ती चालत बोलत होती. रविवाला सायंकाळी ४ वाजता तिने चालताबोलता अखेरचा श्वास घेतला. सोमवारला सकाळी रोहणा येथील सूर नदीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले. मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले.’

Web Title: By returning to death 'she' lived 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.