जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:44 IST2018-09-21T00:43:37+5:302018-09-21T00:44:47+5:30
प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले.

जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना परत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले.
जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या संचालकांनी भंडारातील अनेक गुंतवणुकदारांना आर्थिक प्रलोभन दिले. त्याला बळी पडलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक केली. परंतु सदर कंपनी बंद करून कंपनीचे संचालक पसार झाले. या प्रकरणी शासनाने कंपनीचे रोख १ कोटी १७ लाख आणि काही मालमत्ता जप्त केली होती. परंतु गत काही वर्षांपासून ही रक्कम ठेवीदारांना देण्यात आली नाही. सदर रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदारांनी एक दिवसीय धरणे दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकर यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणात अपर जिल्हाधिकाºयांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. परंतु अद्यापही गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाही.
या आंदोलनात विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपुरे, लिलाधर बन्सोड, ज्ञानेश्वर निकुरे, सूरज कुथे, मधुकर येरपुडे, अविनाश बेलेकर, मीना तोमर, वंदना ठाकरे, शिवचरण बडवाईक, केशवराव बिसने, संतोष मूर्ती, रुपेश दमाहे, ज्ञानेश्वर चापले, डॉ.राजकुमार बावनकर, दिलीप हटवार यांच्यासह असंख्य ठेवीदार उपस्थित होते. अद्यापही रक्कम परत मिळाली नसल्याने ठेवीदारांमध्ये असंतोष पसरला आहे.