प्राचार्य राव यांचा सेवानिवृत्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:36+5:302021-07-15T04:24:36+5:30

भंडारा : वरठी येथील अनुराग अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एम. एस. राव यांच्या निवृत्ती सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन सदाशिवराव पाटील ...

Retirement felicitations of Principal Rao | प्राचार्य राव यांचा सेवानिवृत्ती सत्कार

प्राचार्य राव यांचा सेवानिवृत्ती सत्कार

भंडारा : वरठी येथील अनुराग अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एम. एस. राव यांच्या निवृत्ती सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठीच्या वतीने करण्यात आले होते‌. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोरीताई भोयर या होत्या. याप्रसंगी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. एम. एस. राव, सदाशिवराव पाटील, सुरेश भोयर, प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, प्राचार्य डॉ. रूपाली पाटील, प्राचार्य डॉ. श्याम चरडे, डॉ. संजय वटे, सचिन लोहे, प्राचार्य मुदलियार आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने डॉ. एम.एम. राव यांचा संस्थेचे अध्यक्ष किशोरीताई भोयर यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी डाॅ. राव यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. संस्थेच्या उपाध्यक्ष अनुराधा भोयर यांनी डाॅ. राव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. संस्थेच्या अन्य महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. राव यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. मृणाल माकडे यांनी तर संचालन डॉ. किरण येळणे यांनी केले. आभार प्रा. सुनंदा आंबिलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. भावना डुंभरे,मधुसूदन वैद्य,माकडे, लोहबरे, अनिता पुडके आदींनी सहकार्य केले.

Web Title: Retirement felicitations of Principal Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.