विनायक वाघाये़, सुरेश बिसने यांचा सेवानिवृत्ती सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:40+5:302021-03-09T04:37:40+5:30
मोहाडी : स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा क. महाविद्यालय मोहाडी येथे कार्यरत पर्यवेक्षक सदाशिव वाघाये व स. ...

विनायक वाघाये़, सुरेश बिसने यांचा सेवानिवृत्ती सत्कार
मोहाडी : स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा क. महाविद्यालय मोहाडी येथे कार्यरत पर्यवेक्षक सदाशिव वाघाये व स. शिक्षक सुरेश बळीराम बिसने हे २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. श्री सुदामा शिक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण तितिरमारे, सचीव शरद तितिरमारे, सहसचिव प्रमोद तितिरमारे व पर्यवेक्षक अविनाश चौधरी यांच्या शुभहस्ते सत्कार मूर्तीचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त पर्यवेक्षक विनायक वाघाये व स. शिक्षक सुरेश बिसने यांनी मागील ३० ते ३२ वर्षापासून शाळेला अतुलनीय सेवा देऊन अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे दैदीप्यमान कार्य केले आहेत. त्यांचा कार्याची प्रशंसा सहायक शिक्षक खुशाल शेंडे. कविता झलके व पुरुषोत्तम सेलोकर यांनी आपल्या संबोधनातून केले. संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा गुणगौरव केला. इतर शिक्षकांनीसुद्धा त्यांच्यासारखे तत्पर राहून कार्य करावे, असे संबोधन पर्यवेक्षक- अविनाश चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवकुमार डोंगरे, विनोद ढगे, चुन्नीलाल आगाशे, उइके व बोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन - हेमंत लोंदासे तर आभार भरत रासे यांनी मानले.