रमेश आंबिलकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST2021-01-03T04:35:24+5:302021-01-03T04:35:24+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळकृष्ण ईखार, माजी सरपंच केवळराम कारेमोरे, सुकराम पडोळे, प्रणय लांजेवार उपस्थित होते. सहायक फौजदार रमेश ...

Retirement felicitation of Ramesh Ambilkar | रमेश आंबिलकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

रमेश आंबिलकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळकृष्ण ईखार, माजी सरपंच केवळराम कारेमोरे, सुकराम पडोळे, प्रणय लांजेवार उपस्थित होते. सहायक फौजदार रमेश आंबिलकर व त्यांची पत्नी पूनम आंबिलकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खासदार सुनील मेंढे यांनी सत्कार केला. याप्रसंगी मंदा पडोळे, डॉ. लक्ष्मीकांत बडवाईक, प्रा. सुनंदा कारेमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधा ईखार, सेवानिवृत्त फौजदार मुरली बुरडे, ज्ञानेश्वर हलमारे, अजिंक्य आंबिलकर, प्रा. प्रतिभा खंडाईत, डॉ. दीपक तलमले यांनी आंबिलकर यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला डॉ. मीनाक्षी कारेमोरे, अनिल ईखार, सेवकराम कारेमोरे, विपुल झाडे, माजी प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे उपस्थित होते. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले तर आभार प्रा. मनोज खंडाईत यांनी मानले.

Web Title: Retirement felicitation of Ramesh Ambilkar