बाळकृष्ण नंदेश्वर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:32 IST2021-02-14T04:32:51+5:302021-02-14T04:32:51+5:30

तुमसर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या तुमसर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक बाळकृष्ण नंदेश्वर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. भंडारा ...

Retirement felicitation of Balkrishna Nandeshwar | बाळकृष्ण नंदेश्वर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

बाळकृष्ण नंदेश्वर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

तुमसर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या तुमसर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक बाळकृष्ण नंदेश्वर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रफुल नंदेश्वर, डॉ. करुणा नंदेश्वर व सुशीलकुमार नंदेश्वर यांनी केले होते. यावेळी भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील बॅंकेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. दुर्गादास जांभुळकर, चोखेश्वर नंदेश्वर, हुसेन बडोले, महेश भैसारे, देविदास खंडारे, गोविंदा जांभुळकर, रोशन जांभुळकर, भास्कर जांभुळकर, सोपान नंदेश्वर, राजू जनबंधू, सुमन साखरे, वैशाली जांभुळकर, ‘एलआयसी’चे विकास अधिकारी शरद बिजवे, डॉ. इलमकर, नरेश इलमकर, विजयेंद्र नागदेवे, प्रतीक साखरे, नितीन नंदेश्वर यांच्यासह मित्रमंडळी, सहकारी व नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रफुल नंदेश्वर यांनी केले तर सुशीलकुमार नंदेश्वर यांनी आभार मानले.

Web Title: Retirement felicitation of Balkrishna Nandeshwar