नेहरू विद्यालयात सेवानिवृत्ती सत्कार समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:55+5:302021-07-16T04:24:55+5:30
सासरा : पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सानगडी येथे मुख्याध्यापक पुरुषोत्तम डोमळे यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला ...

नेहरू विद्यालयात सेवानिवृत्ती सत्कार समारंभ
सासरा : पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सानगडी येथे मुख्याध्यापक पुरुषोत्तम डोमळे यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक दीपक लेदे होते. अतिथी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांजेवार, पत्रकार मनोहर लोथे, हेमलता पुरुषोत्तम डोमळे व प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ शिक्षक लक्ष्मण समरीत आदी मान्यवर मंच स्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील बहुसंख्य शिक्षकांनी व मान्यवर मंडळीनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डोमळे यांच्या सेवाकाळातील भूमिकेवर प्रकाश टाकताना कृतज्ञता भाव व्यक्त करुन गौरव केला. यावेळी प्रास्ताविकातून वरिष्ठ शिक्षक लक्ष्मण समरीत यांनी प्रस्तुत कार्यक्रमाच्या आयोजन -नियोजनाविषयी माहिती दिली. संचालन माणिक खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र हर्षे यांनी पार पाडले.