सेवानिवृत्त पोलीस पाटीलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:10+5:302021-01-10T04:27:10+5:30

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदूरचे तहसिलदार निवृत्ती ...

Retired Police Patil felicitated | सेवानिवृत्त पोलीस पाटीलांचा सत्कार

सेवानिवृत्त पोलीस पाटीलांचा सत्कार

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदूरचे तहसिलदार निवृत्ती उईके, ठाणेदार मनोहर कोरेटी, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम , जिल्हा पोलीस पाटील संघटनाध्यक्ष सुधाकर साठवणे, सामाजिक कार्यकर्ते रमेश भय्या, माजी सरपंच पुरुषोत्तम ठाकरे, प्रियंका बोरकर आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी तालुक्यातील विरली येथील एकनाथ भंडारकर, गवराळा येथील माणिक केझरकर, गुंजेपार येथील राजाराम सोनटक्के, सोनी येथील नानाजी देशमुख व टेंभरी येथील मधुकर कांबळे आदी पाच सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वच पोलीस पाटील व बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Retired Police Patil felicitated