हरदोलीत शिक्षकांचा सेवानिवृत्त सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:36 IST2021-04-09T04:36:57+5:302021-04-09T04:36:57+5:30
: दि कल्पना शिक्षण संस्था व कर्मचारी सहकारी संस्था मर्या. हरदोलीच्यावतीने ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी ...

हरदोलीत शिक्षकांचा सेवानिवृत्त सत्कार
: दि कल्पना शिक्षण संस्था व कर्मचारी सहकारी संस्था मर्या. हरदोलीच्यावतीने ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी तथा शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी न्यू विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के. एस. चौधरी होते. पाहुणे म्हणून संस्थापक आर. एस. पारधी, माजी प्राचार्य जी. एफ. राहगडाले, प्राचार्य एस. बी. पटेल, जी. एम. ठाकरे, एस. पी. बोपचे, टी. डी. कटरे, एस. डी. बोपचे, एस. एस. शेंडे, जे. ए. पंचबुद्धे, ए. एच. शेख, के. एस. पटले, पी. पी. गौतम, एम. ए. बघेले, रामभाऊ तुरकर, बी. एम. राणे, आर. एम. बनपूरकर उपस्थित होते. हायस्कूल व महाविद्यालयात कार्यरत शिक्षक तथा कर्मचारी ए. एल. बनकर, जी. पी. गोंधुळे, एस. बी. डहाळे हे सेवानिवृत्त झाले असल्याने महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळी आर. एस. पारधी, के. ए. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन टी. आर. वाहने यांनी केले.