रेती घाट उमरवाडाची, रॉयल्टी मात्र घाटकुरोड्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:47+5:302021-09-23T04:39:47+5:30
तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्र विस्तीर्ण असून, रेती उच्च दर्जाची आहे. शासनाने या घाटाचा लिलाव ...

रेती घाट उमरवाडाची, रॉयल्टी मात्र घाटकुरोड्याची
तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्र विस्तीर्ण असून, रेती उच्च दर्जाची आहे. शासनाने या घाटाचा लिलाव केला आहे. या घाटाला समांतर तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडाचा घाट आहे. उमरवाडा रेतीसाठी घाटकुरोडा येथील रॉयल्टी देण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत केशव खोब्रागडे यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदवली. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले. मंगळवारी या सजाचे तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी घाटाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलाठ्यांनी पंचनामा केला. खबरदारी म्हणून तुमसर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
उमरवाडा येथील रेती घाट घेणाऱ्याचे घाटकुरोडा, बेटाळा, कान्हडगाव, निलज असे पाच घाट आहेत. त्यामुळे रॉयल्टीमध्ये गौडबंगाल सुरू असल्याची माहिती आहे. तुमसर तालुका मुख्यालयापासून उमरवाडा हा घाट केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथील घाटावर असा प्रकार काही दिवसांपासून सुरू असताना महसूल प्रशासनाने दखल का घेतली नाही, असा प्रश्न आहे.
कोट
उमरवाडा येथील रॉयल्टीसंदर्भात तुमसर पोलिसात तक्रार करण्यात आली होती. मंडल अधिकाऱ्यांना यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानंतर दखल घेण्यात येईल.
- बाळासाहेब तेळे, तहसीलदार, तुमसर