रेती भंडारा जिल्ह्याची, वसुली मात्र गोंदिया जिल्ह्याच्या महसूल विभागाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:15+5:302021-02-05T08:39:15+5:30

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी, पोकरटोली, महालगाव, गोंडउमरी या रेती घाटातून दररोज हजारो ब्रास रेतीचे अवैधरित्या उत्खनन केले जाते. ...

Reti of Bhandara district, but recovery of Gondia district revenue department | रेती भंडारा जिल्ह्याची, वसुली मात्र गोंदिया जिल्ह्याच्या महसूल विभागाची

रेती भंडारा जिल्ह्याची, वसुली मात्र गोंदिया जिल्ह्याच्या महसूल विभागाची

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी, पोकरटोली, महालगाव, गोंडउमरी या रेती घाटातून दररोज हजारो ब्रास रेतीचे अवैधरित्या उत्खनन केले जाते. या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. मात्र सदर रेती घाटाच्या सीमा या भंडारा व गोंदिया जिल्ह्याला लागून आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महसूलचे अधिकारी व या रेती घाटाच्या चौकशीसाठी आले असता त्यांना भंडारा जिल्ह्यातील सीमेत येणाऱ्या रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर आढळले.

सुरुवातीला तर महाशयांनी ट्रॅक्टर मालकांना कार्यवाहीचा धाक दाखविला. मात्र नंतर अवैध रेती धारकांशी साठगाठ करून पैसे घेऊन चारही ट्रॅक्टर सोडून दिले. पैसे घेताच चारही ट्रॅक्टर नदीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.

साकोली तालुक्याला गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून असल्यामुळे रात्री गस्तीदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील फिरते पथक फिरत असतात. मात्र कार्यवाहीच्या नावावर अधिकारी आपले खिसे गरम करतात. या घडलेल्या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार होण्याची शक्यता असून सदर प्रकरणात पैसे घेणारे ते अधिकारी कोण याची माहितीही लवकरच उघड होणार असल्याची माहिती आहे. एकीकडे जिल्हाधिकारी अवैध रेती तस्करीवर आळा बसविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात तर दुसरीकडे अधिकारीच अवैध वसुली करून शासनाला कोट्यवधींच्या तोट्यात टाकतात.

बॉक्स

विधानसभा अध्यक्षांकडे करणार तक्रार

सदर प्रकरणात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले त्यांची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात येणार आहे. या तक्रारीनंतर अवैध वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बॉक्स

पोलीस चौकी कशासाठी?

या रेती चोरीवर आळा बसविण्यासाठी महसूल विभाग अपयशी ठरला. त्यामुळे रेती तस्करीवर आळा बसला म्हणून पोलीस विभागामार्फत परसोडी व महालगाव या दोन गावी पोलीस चौकी बसविण्यात आली. मात्र पोलीस चौकीतील पोलीसही रात्री अवैध रेती तस्करांशी सेटिंग करून रेती तस्करीकडे दुर्लक्ष करतात. जर पोलीस चौकीतील पोलीस रात्री कार्यरत असते तर रात्री अवैध तस्करी होतेच कशी हाही प्रश्नच आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Reti of Bhandara district, but recovery of Gondia district revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.